Last Updated on 27 Aug 2024 9:37 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सातारा । काही दिवसांच्या विश्रांतीनंतर कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. नवजा व महाबळेश्वरला दीडशे मिलिमीटरच्या आसपास पावसाची नोंद झाली आहे. धरणाचा एकूण पाणीसाठा 98.89 टीएमसी झाला आहे. धरण 92.03 टक्के भरले आहे. धरणात पाण्याची आवक वाढली असून ही आवक 38 हजार 271 क्यूसेक्स इतकी आहे. दरम्यान, कोयना धरण पायथा विद्युत गृहातून 2100 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु होणार आहे.
गेल्या काही दिवसात पावसाने कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह तालुक्यात पूर्ण उघडीप दिली होती. मात्र, गेल्या चार -पाच दिवसांपासून पुन्हा पाऊस पडू लागला आहे.कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढत नव्हते; परंतु शुक्रवारपासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढले आहे.पश्चिम घाटक्षेत्रात पावसाचे पुनरागमन झाले आणि कोयना पाणलोटातील वार्षिक सरासरीच्या समीप रेंगाळलेल्या पावसाचे प्रमाण चालू हंगामाचा बराच कालावधी शिल्लक असताना, रविवारी वार्षिक सरासरी मागे टाकणारा ठरले. पश्चिम घाटक्षेत्रात पुन्हा कोसळू लागलेल्या पावसाचा जोर कोयना पाणलोटात वाढू लागला आहे.
महत्त्वाची सूचना : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्यामुळे धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे आज दि. 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू करून 2100 क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
यंदा जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पावसाला सुरूवात झाली.तर जुलै महिन्यात अतिवृष्टी होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते. जून ते जुलै या दोन महिन्यांचा विचार करता जिल्ह्यात अधिक चांगले पर्जन्यमान झाले.
मंगळवारी (27 ऑगस्ट) सकाळीआठ वाजेपर्यंत कोयना धरणामध्ये साधारण 136 मिलिमीटर, नवजा येथे 139 मिलिमीटर तर महाबळेश्वर येथे 142 मिलिमीटर इतका पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
एक जूनपासून आतापर्यंत कोयनेत 4 हजार 770 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर नवजा येथे आतापर्यंत 5 हजार 630 आणि महाबळेश्वरमध्ये 5 हजार 407 मिलीमीटर पाऊस झाला आहे.
कोयना धरण
दि.27/08/2024, वेळ:-सकाळी 08:00 वाजता
पाणीपातळी : 2158’07″(657.936मी)
पाणीसाठा : 98.89 टीएमसी (92.03 टक्के)
आवक:- 38,271 क्यूसेक्स
पायथा ग्रहातून 00 क्यूसेक्स विसर्ग कोयना नदीपत्रात सुरु आहे
पाऊस मि मी (आज/एकूण)
कोयना 136/4770
नवजा 139/5630
महाबळेश्वर 142/5407
पूर नियंत्रण कक्ष
सांगली पाटबंधारे विभाग सांगली.
दिनांक–27/08/2024 8:00 AM
पाणी पातळी – (फूट इंचामध्ये)
(धोका पातळी/आत्ताची पातळी )
1)कृष्णा पूल कराड-(55.0)/ 16’03”
2) बहे पूल-(23.7)9’3″
3) ताकारी पूल (46)/26’4″
4)भिलवडी पूल -(53)27’4″
5)आयर्विन- (45)/22’09”
6)राजापूर बंधारा-(58)/35’5″
7) राजाराम बंधारा-(43)/33’9″
पाणीसाठा (TMC)/विसर्ग (क्यूसेक्स मध्ये)
1) कृष्णा पूल कराड- 28771
2) आयर्विन पूल – 37789
3) राजापूर बंधारा – 73875
4) राजाराम बंधारा – 34511
5) कोयनाधरण- 98.58 TMC/0
6)वारणा धरण- 33.27 TMC/ 2435
7)अलमट्टी धरण-121.957
आवक – 98781
जावक-125000










































































