Last Updated on 26 Aug 2024 1:04 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । मुलींचे लैंगिक शोषण आणि छळापासून संरक्षण करण्यासाठी निर्भया पथकाकडून सतत मोहीम राबवली जात आहे. तालुक्यातील शाळा, महाविद्यालयामध्ये महिला पोलीस अधिकारी जाऊन विद्यार्थीनींना ‘गुड टच, बँड टच’, याविषयी समजावुन सांगत आहेत. जेणेकरून कोणीही त्यांच्याशी गैरवर्तन केले तर त्यांना लगेच समजेल. बदलापूर सारख्या घटना घडू नयेत यांची दक्षता शाळा प्रशासनाने घेतली पाहिजे. कोणताही अनुचित प्रकार घडल्यास तात्काळ ११२ वरती संपर्क साधण्याची सूचना पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांनी दिली.
इस्लामपूर येथील राजारामबापू मिलिटरी शाळेत मुला मुलींना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. शहरातील विविध शाळेत जाऊन पोलीस पथकाने मार्गदर्शन केले.
हारुगडे म्हणाले, विद्यार्थीनींना शाळेत मोबाईलचा वापर कमी प्रमाणात करावा. बदलापूर सारखी घटना घडू नये. यासाठी शाळा प्रशासनाने दक्षता घेणे आवश्यक आहे. मुली, महिलांच्या सुरक्षिततेविषयी जनजागृती केली पाहिजे.
ये-जा करताना काही जणांकडून अश्लील किंवा अनावश्यक कमेंट केल्या जातात. अशा कमेंट होत असल्यास विद्यार्थिनींनी आई-वडील, शिक्षिका, किंवा निर्भया पथकाला माहिती द्यावी. किंवा पोलिसांच्या ११२ या हेल्पलाइन क्रमांकावर माहिती द्यावी. त्यामुळे छेडछाडीच्या प्रकारांना आळा बसण्यास मदत होईल. विद्याथ्यांनी
यावेळी पोलीस अधिकारी, राजारामबापू मिलिटरी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी, शिपाई उपस्थित होते.









































































