पुणे । आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्याच्या निर्णयाविरोधात पुण्यात ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांकडून आंदोलन सुरु होते.एमपीएससीच्या गुरुवारीच्या बैठकीत 25 ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.परीक्षेचं सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची आज सकाळी 10 वाजता बैठक झाली. यामध्ये परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. आयोग X वर म्हटले आहे की, ‘आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहिर करण्यात येईल.’
दरम्यान, आयोगाने पुढे ढकलण्यात आलेल्या परिक्षेत कृषी विभागाच्या 258 जागांचा देखील समावेश करावा. या 258 जागांसाठी परिक्षा घेण्याचे नोटीफिकेशन काढावे अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा विद्यार्थ्यांचा निर्णय आहे. कृषी विभागाच्या जागांबाबत जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार आहे.