मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत निवड मेळावा
मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांची माहिती
सांगली | मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत जिल्हा परिषद सांगली व त्यांच्या अधिनस्त कार्यालयामध्ये 1 हजार 230 पदांवर प्रशिक्षणाची संधी आहे. या पदांसाठी दि. 22 व 23 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हा परिषद सांगली येथे निवड मेळावा आयोजित केलेला आहे. तरी 18 ते 35 वयोगटातील इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीस येताना शैक्षणिक कागदपत्राच्या मुळ प्रती व दोन छायांकित प्रती तसेच Employment कार्ड, आधार कार्ड, बॅक पासबुकच्या दोन छायांकित प्रती घेऊन उपस्थित रहावे व उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in/ या संकेतस्थळावर नोंदणी करावी. ज्या उमेदवारांनी Employment कार्डची नोंदणी केलेली नाही अशा उमदेवारांनीही मुलाखतीस उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.
शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविण्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. युवक, युवतींना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी या कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक अहर्तप्रमाणे 12 वी पास 6 हजार, आयटीआय/पदवीका 8 हजार व पदवीधर/पदव्युत्तर 10 हजार शासनाकडून विद्यावेतन दिले जाणार आहे. या कार्य प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
उमेदवाराची पात्रता – उमेदवाराने Employment कार्ड काढलेले असावे, उमदेवाराचे किमान वय 18 व कमाल 35 वर्षे असावे, उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा, उमेदवाराची आधार नोंदणी असावी, आधार संलग्न असलेले बँक खाते पासबुक / कॅन्सल चेक असावा, शिक्षण चालू असणारे उमेदवार या योजनेस पात्र असणार नाहीत.
जिल्हा परिषद सांगली व त्यांच्या अधिनस्त कार्यालयामधील पुढील पदांसाठी प्रशिक्षणार्थींची आवश्यकता आहे. विभागनिहाय पदाचे नाव, पदांची संख्या, पदाची पात्रता व निवड मेळाव्याचे ठिकाण पुढीलप्रमाणे –
सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद सांगली – परिचर पदांची संख्या 23 व चौकीदार पद 1 असून या दोन्ही पदांसाठी पदाची पात्रता 12 वी पास आहे. या पदांसाठी निवड मेळावा सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद कार्यालय सांगली येथे आहे.
पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद सांगली – पशुधन पर्यवेक्षक पदांची संख्या 3 असून पदाची पात्रता (अ) संविधिक विद्यापीठाची, पशुवैद्यक शास्त्रातील पदवी धारणा करीत असलेल्या व्यक्ती किंवा (ब) पशुधन पर्यवेक्षक, पशुपाल, पशुधन सहायक, सहायक पशुधन विकास अधिकारी किंवा पशुधन विकास अधिकारी (ब श्रेणी) या बाबतची पशूसंवर्धन संचालनालयाने दिलेली पुढील पदविका किंवा प्रमाणपत्र धारण करणाऱ्या व्यक्ती. या पदांसाठी निवड मेळावा पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद कार्यालय, सांगली येथे आहे.
ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद सांगली – कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदांची संख्या 2 असून पदाची पात्रता स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यता प्राप्त पदवी किंवा पदविका (3 वर्षाचा पाठ्यक्रम) किंवा समतुल्य अर्हता करीत असतील असे उमेदवार. निवड मेळाव्याचे ठिकाण ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद कार्यालय, सांगली येथे आहे.
कृषी विभाग, जिल्हा परिषद सांगली – विस्तार अधिकारी एक पद असून पदाची पात्रता ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कृषी विषयातील पदवी किंवा इतर कोणताही समतूल्य अर्हता धारण केली असेल अशा उमेदवारांनी नामनिर्देशनव्दारे नेमणूक करण्यात येईल. परंतु कृषी विषयातील उच्च शैक्षणिक अर्हता आणि कृषी विषयक कामाचा अनुभव किंवा कृषी पध्दतीचे व्यवसायाचे ज्ञान व ग्रामीण जीवनाचा अनुभव असेल अशा उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल. निवड मेळाव्याचे ठिकाण कृषी विभाग, जिल्हा परिषद कार्यालय, सांगली येथे आहे.
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सांगली – आरोग्य सेवक (पुरुष) पदांची संख्या 4 असून पदाची पात्रता विज्ञान विषय घेवून माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार, ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यासाठी असणारा 12 महिन्याचा मुलभूत पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला असावा. आरोग्य सेवक (पुरुष) 50 टक्के (हंगामी फवारणी मधून) पदांची संख्या 4 असून पदाची पात्रता विज्ञान विषय घेवून माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार, राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रम अंतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून 90 दिवसांचा अनुभव धारकांना प्राधान्य असेल. आरोग्य सेविका पदांची संख्या 55 असून पदाची पात्रता ज्यांची अर्हता प्राप्त साह्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील अशी आहे. या सर्व पदांसाठी निवड मेळावा समिती सभागृह, जिल्हा परिषद सांगली येथे होणार आहे.
प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सांगली – विस्तार अधिकारी पदांची संख्या 1 असून पदाची पात्रता बी.ए/बी.कॉम/बीएससी किमान 50टक्के + बी एड अथवा समकक्ष पदवी किमान 50 टक्के + मान्यता प्राप्त प्राथमिक / माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय, अध्यापक विद्यालयामील शासन मान्य पदावरील सक्षम प्राधिकाऱ्याने वैयक्तिक मान्यता दिलेला किमान 3 वर्षाचा अध्यापनाचा किंवा प्रशासनाचा अनुभव अशी आहे.
उपशिक्षक (मराठी) पदांची संख्या 220, विज्ञान व गणित (विषय शिक्षक) पदांची संख्या 22, भाषा (विषय शिक्षक) पदांची संख्या 21, उपशिक्षक (कन्नड) पदांची संख्या 17, विज्ञान व गणित (विषय शिक्षक) पदांची संख्या 2, भाषा (विषय शिक्षक) पदांची संख्या 2, उपशिक्षक (उर्दू) पदांची संख्या 4, विज्ञान व गणित (विषय शिक्षक) पदांची संख्या 2, भाषा (विषय शिक्षक) पदांची संख्या 1 असून या सर्व पदांची पात्रता डी.टी.एड किंवा बी. एड (TET व CET अट शासनाच्या मान्यतेच्या अधिन राहून शिथिल करण्यात आली आहे) अशी आहे.
डाटा एन्ट्री ऑप्रेटर/ ऑफिस असिसटंट पदांसाठी आटपाडी – 14, कवठेमहांकाळ – 11, मिरज – 14, शिराळा – 14, पलूस – 8, तासगाव – 11, वाळवा – 19, कडेगाव – 8, जत – 28, खानापूर -9 इतकी पदांची संख्या आहे. पदाची पात्रता 12 वी पास + MS-CIT किंवा समतुल्य संगणकीय अर्हता अशी आहे.
प्राथमिक शिक्षण विभागाकडील सर्व पदांसाठी निवड मेळावा मा. वसंतदादा पाटील सभागृह जिल्हा परिषद सांगली येथे आहे.
ग्रामपंचायत विभाग, जिल्हा परिषद सांगली – जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीस (प्रत्येकी 1 पद) या प्रमाणे 696 पदे असून पदाची पात्रता 12 वी पास/ कोणत्याही शाखेचा पदवीधर (संगणक ज्ञान व टायपिंग असणाऱ्या प्राधान्य) अशी आहे. निवड मेळावा ग्रामपंचायत विभाग, जिल्हा परिषद सांगली येथे आहे.
जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद सांगली – ट्रेनी पदांची संख्या 1 असून पदाची पात्रता कोणत्याही शाखेचा पदवीधर अशी आहे. निवड मेळावा जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद सांगली येथे आहे.
जलसंधारण विभाग (लघु पाटबंधारे), जिल्हा परिषद सांगली – ट्रेनी-कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदांची संख्या 1 असून पदाची पात्रता पदवीधर – सिव्हिल इंजिनिअर अशी आहे. तर ट्रेनी-डाटा एन्ट्री ऑप्रेटर पदांची संख्या 1 असून पदाची पात्रता कोणत्याही शाखेचा पदवीधर, टंकलेखन (मराठी – 30 किंवा इंग्रजी – 40 प्र.श.मि.) अशी आहे. निवड मेळावा जलसंधारण विभाग (लघु पाटबंधारे), जिल्हा परिषद सांगली येथे आहे.
बांधकाम विभाग, जिल्हा परिषद सांगली – ट्रेनी-कनिष्ठ अभियंता व स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पदांची संख्या प्रत्येकी 2 असून पदाची पात्रता पदवीका किंवा पदवीधर – सिव्हिल इंजिनिअर अशी आहे. निवड मेळावा बांधकाम विभाग, जिल्हा परिषद सांगली येथे आहे.
महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद सांगली – ट्रेनी- सहायक अंगणवाडी पर्यवेक्षिका (महिला) पदांची संख्या 5 असून पदाची पात्रता 12 वी पास किंवा पदवीधर + MS-CIT अशी आहे. तर डाटा एन्टी ऑप्रेटर पदाची संख्या 1 असून पदाची पात्रता 12 वी पास किंवा पदवीधर + टंकलेखन (मराठी – 30 किंवा इंग्रजी – 40 प्र.श.मि.) अशी आहे. निवड मेळावा महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद सांगली येथे आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सांगली, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, विजयनगर सांगली येथे संपर्क साधावा, असे प्रसिध्दीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.