सांगली । वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटी इस्लामपूरच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील हिंदी विषयाचे प्राध्यापक आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. गोरखनाथ किर्दत यांना सन 2022 -23 चा महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी प्रशंसा प्रमाणपत्र पुरस्कार नुकताच जाहीर झाला
या पुरस्कारासाठी शिवाजी विद्यापीठातून त्यांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता.राष्ट्रीय सेवा योजनेतील महाविद्यालयीन पातळीवरील स्वच्छता,जल साक्षरता,जलसंधारण,वृक्षारोपण,जनजागृती,आपत्ती व्यवस्थापन, रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे इत्यादी सामाजिक कार्याची दखल घेऊन शासनाच्या वतीने हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. प्रा.किर्दत हे गेली बारा वर्षे सातत्याने राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी म्हणून तसेच मागील तीन वर्षापासून शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय समन्वयक म्हणून ही त्यांनी काम केले आहे.
तसेच मागील चार वर्षापासून शिवाजी विद्यापीठाचे जिल्हास्तरीय उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी म्हणून त्यांची निवड झाली असून चालू वर्षीचा राज्य शासनाचा पुरस्कारही त्यांना जाहीर झाला आहे.
त्यांच्या या यशात संस्थेचे मानद सचिव, एडवोकेट बी. एस. पाटील,(अण्णा )सहसचिव, एडवोकेट धैर्यशील पाटील (बाबा )यांची प्रेरणा व डॉ. टी.एम.चौगुले समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना शिवाजी विद्यापीठ,कोल्हापू यांचे मार्गदर्शन ,प्राचार्य डॉ. ए.एम. जाधव, प्रोफेसर डॉ. अशोक शिंदे यांचेही मार्गदर्शन लाभले.