Last Updated on 15 Aug 2024 6:41 AM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे । राज्य परिवहन महामंडळाच्या महिला सन्मान योजनेला चांगला प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे.जुलै 2024 अखेरपर्यंत पुणे विभागात साडेतीन कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
यंदा श्रावण महिन्यात धार्मिम स्थळी जाण्यासाठी एसटीसंगे तीर्थपर्यटन अशी सेवा सुरू केल्याने त्याचाही फायदा होणार आहे.यामुळे महिला प्रवाशांबरोबर ज्येष्ठ नागरिक देखील या योजनेचा लाभ घेवू शकणार आहेत.यंदा दहा ते वीस टक्के प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. एसटीच्या विविध योजना असल्याने सध्या एसटीने प्रवास करणा-यांची संख्या वाढली आहे. त्याचा एसटीला फायदा होईल, अशी अपेक्षा पुणे विभाग नियंत्रक प्रमोद नेहूल यांनी व्यक्त केली.









































































