Last Updated on 14 Aug 2024 10:42 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी बँकेची प्रक्रिया सुरू झाली आहे असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
महिला व बाल विकास मंत्री कु.आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची आढावा बैठक झाली. यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव अनूपकुमार यादव,आयुक्तडॉ.प्रशांत नारनवरे, बँकेचे अधिकारी उपस्थित होते.
महिला व बाल विकास मंत्री तटकरे म्हणाल्या की, राज्यात आतापर्यत १ कोटी ६४ लाख ४० हजारपेक्षा अधिक महिलांची नोंदणी पूर्ण झाली आहे. अजूनही नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. यासाठी पात्र महिलेचे बँक खाते आधार लिंक असणे आवश्यक आहे. असेही तटकरे यांनी यावेळी सांगितले.
लाडक्या बहिणींसाठी आजपासूनच बँक प्रक्रिया सुरु…

दरम्यान, राज्यातील लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली असून राज्यातील विविध जिल्ह्यात महिलांच्या बँक खात्यात योजनेचा पहिला हफ्ता म्हणून 3 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे.स्वत: महिला व बाल विकासमंत्री आदिती तटकरे यांनी व्हिडिओ शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी बँकेची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे,असे त्यांनी म्हटले.मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची तीन हजार रुपयांची रक्कम आज भंडारा जिल्ह्यातील काही महिलांच्या खात्यावर जमा झाल्या आहेत

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध
शिवाजी साटम, आशा पारेख यांना जीवनगौरव पुरस्कार! राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची घोषणा
तीन पोलीस अधिकाऱ्यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, 17 पोलिस अधिकाऱ्यांना ‘पोलीस शौर्य पदक’ तर…
भारतातील पहिल्या स्वदेशी डेंग्यू लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलची सुरुवात
बहिणीने आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी वेगळ्या मुहूर्ताची गरज नाही; ज्योतिष शास्त्री प्रभाकर जंगम









































































