पुणे । महसूल खात्याने तहसीलदारांच्या बदल्या करण्यास सुरुवात केली आहे. पुणे विभागातील १२ तहसीलदारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या बदल्या करण्यात आल्या आहेत. जाणून घ्या कुणाची कुठे झाली बदली…
पुणे शहरच्या तहसीलदार रोहिणी शंकरदास यांची सांगली जिल्ह्यातील संख येथील अपर तहसीलदार म्हणून बदली करण्यात आली आहे.सांगली जिल्ह्यातील संख चे अप्पर तहसीलदार सुधाकर माघाडे यांची पुणे शहर संजय गांधी योजना तहसीलदार पदी नियुक्ती करण्यात आली आहे.कराडचे तहसीलदार विजय पवार यांची कोल्हापूरच्या जिल्हा कार्यालयातील तहसीलदार पदी नियुक्ती करण्यात आली आहे.कल्पना ढवळे यांची कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातून कराड येथील तहसीलदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
वाळवा-इस्लामपूरचे तहसीलदार प्रदीप उबाळे यांची कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार पदी नियुक्ती करण्यात आली आहे.भोरचे तहसीलदार सचिन पाटील यांची वाळवा-इस्लामपूर तालुक्याच्या तहसीलदार पदी बदली करण्यात आली आहे. कोल्हापूरचे तहसीलदार चंद्रशेखर सानप यांची विभागीय आयुक्त कार्यालयात पुनर्वसन विभागाच्या तहसीलदार पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
वन मंत्रालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून राहिलेले सुनील शेळके यांची जुन्नर तालुक्यातील तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आले आहे. तर जुन्नरचे तहसीलदार रवींद्र सबनीस यांची अहमदनगर जिल्हा कार्यालयातील महसूल विभागाचे तहसीलदार म्हणून बदली करण्यात आली आहे.विभागीय आयुक्तालयातील पुनर्वसन तहसीलदार दशरथ काळे यांची रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्याच्या तहसीलदार पदी बदली करण्यात आली आहे.
इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांची जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथील सामान्य शाखेमध्ये बदली करण्यात आली आहे, तर त्यांच्या जागी सांगली जिल्ह्यातील जतचे तहसीलदार जीवन बनसोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.