Last Updated on 03 Aug 2024 7:59 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस चालू असून पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे.सातारा जिल्ह्यासाठी शनिवारी व रविवारी अति मुसळधार पावसाची (रेड अलर्ट) शक्यता वर्तविली आहे.धरण पायथा विद्युत गृहामधील 2 हजार 100 क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग 52 हजार 100 क्युसेक्स सुरु आहे.
आज दि. 3 ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी 5 वाजता धरणामध्ये एकूण 86.63 टीएमसी 82.31 टक्के पाणीसाठा झाला आहे..
शनिवार (3 ऑगस्ट) सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयना धरणामध्ये साधारण 43 मिलिमीटर, नवजा येथे 16 मिलिमीटर तर महाबळेश्वर येथे 45 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.सततच्या पडणाऱ्या पावसामुळे 105.25 टीएमसी क्षमता असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठा 86.63 टीएमसी इतका झाला असून धरण 82.31 टक्के भरले आहे.
कोयना धरण
दि.03/08/2024, वेळ:सायंकाळी 05:00 वाजता
पाणीपातळी : 2148’07″(654.888मी)
पाणीसाठा : 86.63 टीएमसी(82.31%)
आवक :- 45,870 क्यूसेक्स
कोयना धरणाच्या वक्र दरवाजातून 50000 क्यूसेक्स व पायथा ग्रहातून 2100 क्यूसेक्स असा 52,100 विसर्ग कोयना नदीपत्रात सुरु आहे
पाऊस मि मी (आज/एकूण)
कोयना 43/3980
नवजा 16/4643
महाबळेश्वर 45/4368
आज सायंकाळी 5 वाजताची पाणी पातळी दिनांक-3/08/2024 5:00 PM
पाणी पातळी – (फूट इंचामध्ये)
(धोका पातळी/आत्ताची पातळी)
1) कृष्णा पूल कराड-(55.0)/27’01”
2) बहे मूल-(23.7)12’10”
3) ताकारी पूल (46)/43’10”
4) भिलवडी पूल -(53)42’09”
5) आयर्विन- (45)/39’11”
6) राजापूर बंधारा-(58)/52’09”
7) राजाराम बंधारा-(43)/42’01”
पाणीसाठा (TMC)/ विसर्ग (क्यूसेक्स मध्ये)
1) कृष्णा पूल कराड- 68298
2) आयर्विन पूल – 97457
3) राजापूर बंधारा – 239574
4) राजाराम बंधारा – 61803
5) कोयना धरण- 86.63 TMC/52100
6) वारणा धरण- 29.41 TMC/11575
7) अलमट्टी धरण- 69.359 आवक – 319916 जावक-300000

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसरात भारतीय हवामान खात्याने पावसाचा रेडअलर्ट जारी केला आहे. खडकवासला भागात सध्या मुसळधार पाऊस होत असल्याने सध्या 27,000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
पाऊस आणखी वाढला तर यापेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ती शक्यता गृहित धरुन स्वत: सिंचन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांनी पुणे विभागीय आयुक्तांना संपूर्ण स्थितीची माहिती दिली आहे.












































































