सातारा । कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस चालू असून पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे.भारतीय हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासाठी शनिवारी व रविवारी अति मुसळधार पावसाची (रेड अलर्ट) शक्यता वर्तविली असल्याने सद्यस्थितीत सांडव्यावरून 40 हजार क्यूसेक्स विसर्ग चालू आहे.उद्या दि. 2 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता सांडव्यावरून सोडण्यात आलेल्या विसर्गात वाढ करून 50 हजार क्युसेक्स विसर्ग सोडण्यात येणार आहे
आज दि. 1 ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी 5 वाजता धरणामध्ये एकूण 86.19 टीएमसी 81.84 टक्के पाणीसाठा झाला आहे.धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस चालू असून पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. भारतीय हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासाठी शनिवारी व रविवारी अति मुसळधार पावसाची (रेड अलर्ट) शक्यता वर्तविली आहे.या दरम्यान धरणामध्ये येणाऱ्या अतिरिक्त येव्याचा विचार करता धरणामधील विसर्ग वाढविणे आवश्यक आहे.
सद्यस्थितीत सांडव्यावरून 40 हजार क्यूसेक्स विसर्ग चालू आहे.उद्या दि. 2 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता सांडव्यावरून सोडण्यात आलेल्या विसर्गात वाढ करून 50 हजार क्युसेक्स विसर्ग सोडण्यात येणार आहे. तसेच येव्यानुसार त्यामध्ये वाढ करण्यात येणार आहे. धरण पायथा विद्युत गृहामधील 2 हजार 100 क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग 52 हजार 100 क्युसेक्स असणार आहे.
कोयना/कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गुरुवारी (2 ऑगस्ट) सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयना धरणामध्ये साधारण 25 मिलिमीटर, नवजा येथे 49 मिलिमीटर तर महाबळेश्वर येथे 33 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.सततच्या पडणाऱ्या पावसामुळे 106.25 टीएमसी क्षमता असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठा 86.19 टीएमसी इतका झाला असून धरण 81.84 टक्के भरले आहे.
एक जूनपासून आतापर्यंत कोयनेत 3 हजार 788 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर नवजा येथे आतापर्यंत 4 हजार 485 आणि महाबळेश्वरमध्ये 4 हजार 131 मिलीमीटर पाऊस झाला आहे.
कोयना धरण
दि.01/08/2024,वेळ:सायंकाळी 05:00 वाजता
पाणीपातळी:2148’01″(654.736मी)
पाणीसाठा:86.19 टीएमसी(81.89%)
आवक:- 45,280 क्यूसेक्स
कोयना धरणाच्या वक्र दरवाजातून 40000 क्यूसेक्स व पायथा ग्रहातून 2100 क्यूसेक्स असा 42,100 विसर्ग कोयना नदीपत्रात सुरु आहे
पाऊस मि मी (आज/एकूण)
कोयना 25/3788
नवजा 49/4485
महाबळेश्वर 33/4131
पूर नियंत्रण कक्ष,सांगली पाटबंधारे विभाग सांगली.
दिनांक–01/08/2024 5:00 PM
पाणी पातळी – (फूट इंचामध्ये)
(धोका पातळी/आत्ताची पातळी )
1)कृष्णा पूल कराड-(55.0)/25’06”
2) बहे पूल-(23.7)12’07”
3) ताकारी पूल (46)/43’0”
4)भिलवडी पूल -(53)42’07”
5)आयर्विन- (45)/40’05”
6)राजापूर बंधारा-(58)/53’02”
7) राजाराम बंधारा-(43)/42’5″
पाणीसाठा (TMC)/विसर्ग (क्यूसेक्स मध्ये)
1) कृष्णा पूल कराड- 61659
2) आयर्विन पूल – 101082
3) राजापूर बंधारा – 245916
4) राजाराम बंधारा – 62143
5) कोयनाधरण- 86.20 TMC/42100
6)वारणा धरण- 29.67 TMC/ 11585
7)अलमट्टी धरण- 66.50
आवक – 350000
जावक-350000