Last Updated on 30 Jul 2024 3:01 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । वाळवा तालुक्यातील गोटखिंडी येथील आरती प्रकाश टिबे हिला चेक रिपब्लिक येथील Phd साठी Fellowship आहे.पण घरची गरिबी असल्यामुळे संभाव्य साडे तीन लाख रुपये खर्चासाठी लोक सहभाग हवा आहे.कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी दीड लाख रुपये जमवले आहेत.आरती या धडपड्या सावित्रीच्या लेकीला आपली मदत हवी आहे.
आरती टिबे हिने शिवाजी विद्यापीठातून नॅनो टेक्नॉलॉजी विषयात Bsc – Msc पदवी संपादन केली. अण्णासाहेब डांगे महाविद्यालयातून बारावी झाल्यानंतर आरतीने कमवा शिका योजनेतून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.वडिलांचे निधन झाल्यानंतर आशा वर्कर म्हणून काम करणाऱ्या आई श्रीमती पुष्पा प्रकाश टिबे यांनी मुलीचे शिक्षण पूर्ण केले. चेक रिपब्लिक येथील Phd साठी Fellowship आहे पण घरची गरिबी असल्यामुळे संभाव्य साडेतीन लाख रुपये खर्चासाठी लोक सहभाग हवा आहे. कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी दीड लाख रुपये जमवले आहेत.आरती या धडपड्या सावित्रीच्या लेकीला आपली मदत हवी आहे.
आपण सर्वजण मिळून विं.दा.करंदीकरांच्या,
देणाऱ्याने देत जावे
घेणाऱ्याने घेत जावे
घेता घेता एक दिवस
देणाऱ्याचे हात घ्यावे
या ओळी सार्थ कराव्या.
आरतीच्या बँक खात्याचा तपशील असा :
Bank of india
Account no.152010510002373
IFSC code. BKID0001520
प्रा.डॉ.संजय थोरात









































































