Last Updated on 24 Jul 2024 2:25 PM by Sanjay Patil/Adhorekhit
काठमांडू । नेपाळची राजधानी काठमांडू येथे विमान कोसळले आहे.विमानातील 19 जणांपैकी 18 जणांचा मृत्यू झाला आहे. जखमी पायलट कॅप्टन एम. शाक्य यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे विमान काठमांडूहून पोखराला जात होते.
सकाळी 11.11 वाजता पोखरा येथे जाण्यासाठी त्रिभुवन विमानतळावरुन हे विमान उडाले आणि आकाशात तिरपे होत थेट जमीनीवरच कोसळले. रनवेवर काही अंतरावर एयरपोर्टच्या पूर्व भागात ते कोसळले आणि त्याने लागलीच पेट घेतला.नेपाळमधील काठमांडू येथील त्रिभुवन विमानतळावर हा भयंकर अपघात घडला आहे.
विमानाचे पायलट 37 वर्षीय पायलट कॅप्टन एम. आर. शाक्य यांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे.त्यांना क्रॅश साईटवरून रेस्क्यू केले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या विमानाला ( बम्बार्डियर CRJ-200ER ) साल 2003 मध्ये तयार केले होते. विमानला एयरलाइंस स्टाफ दुरुस्तीसाठी घेऊन चालला होता.पोखरा येथे दुरुस्तीसाठी या विमानाला घेऊन जात असताना हा अपघात घडला. विमानाने रवने 2 वरुन टेक ऑफ घेतले आणि काही क्षणातच ते रनवे 20 वर क्रॅश झाले.
अपघातानंतर लगेचच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक बचाव कार्यासाठी घटनास्थळी पोहोचले.अपघातानंतर विमानाला आग लागली. ते लगेचच विझवण्यात आले.
घटनास्थळावरून समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये धुराचे लोट उठताना दिसत आहेत. मात्र हा अपघात नेमका कशामुळे झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
नेपाळमध्ये विमान अपघातांचा मोठा काळा इतिहास आहे, गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात मोठा विमान अपघात झाला होता, त्यात 72 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. यती एअरलाईन्सचे विमान पोखरा विमानतळावर उतरण्यापूर्वीच कोसळले होते. त्यातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला.









































































