सांगली । महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांनी घेतलेल्या औषधनिमार्णशास्त्र पदविका अभ्यासक्रमाच्या उन्हाळी परिक्षा 2024 चा निकाल जाहीर झाला असुन वाळवा तालुका शिक्षण संस्थेच्या एस्. डी. पाटील इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी या शाखेच्या डी. फार्मसीच्या वार्षिक परिक्षेचा निकाल प्रथम वर्षाचा 90 टक्के व द्वितीय वर्षाचा 96 टक्के लागला.
प्रथम वर्षाच्या 12 व द्वितीय वर्षाच्या 26 विद्यार्थ्यांना 75 टक्केच्या वर गुण प्राप्त झाले असुन प्रथम वर्षातील विद्यार्थी गवळी तेजश्री विजय हिने 88. 40 टक्के मिळवुन प्रथम क्रमांक मिळवला आहे. द्वितीय क्रमांक 84. 20 टक्के वारूसे जेबा ताहिर तसेच त्रितीय कमांक 82.20 टक्के पाटील दिव्या बाळासो, त्याचप्रमाणे द्वितीय वर्षातील भोसले श्रेया श्रीकृष्ण हिने 87.18 टक्के मिळवुन प्रथम क्रमांक मिळवला,द्वितीय क्रमांक 86.09 टक्के मुल्ला महेक सादिक तसेच त्रितीय क्रमांक 84.18 टक्के कोळेकर योगीता नेताजी मिळवला.
दरवर्षी प्रमाणे यंदाही एस्. डी. पाटील इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी, या महाविद्यालयाने उज्वल यशाची पंरपरा अबाधित राखली असुन गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे मानद सचिव,अॅड्. बी. एस्. पाटील अण्णा व अॅड्. धैर्यशील बी. पाटील बाबा सहसचिव यांनी अभिनंदन केले.