नवी दिल्ली । मोदी मंत्रिमंडळाने पहिल्याच बैठकीत गरिबांसाठी तीन कोटी नवीन घरे बांधण्यास मंजुरी दिली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत खेडोपाडी आणि शहरांमध्ये बांधलेल्या या घरांमध्ये शौचालय, वीज, पाणी आणि गॅस कनेक्शन असणार आहे.
मोदी 3.0 ची पहिली कॅबिनेट बैठक सोमवार, 10 जून रोजी पंतप्रधान निवासस्थानी झाली. यामध्ये सर्व कॅबिनेट मंत्री सहभागी झाले होते.
गेल्या 10 वर्षांत 4.21 कोटी घरे बांधण्यात आली
गेल्या 10 वर्षांत या योजनेअंतर्गत एकूण 4.21 कोटी घरे बांधण्यात आली आहेत. या योजनेंतर्गत घरे बांधण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते.