Last Updated on 16 Mar 2024 9:28 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । विरोधकांना मान्य नसलं त्यांनी कितीही टीका केली तरी पुन्हा एकदा केंद्रात मोदी सरकार येणार हे जनतेनं ठरवलं आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकारपरिषदेत ते आज मुंबईत बोलत होते.
देशाला मोदींशिवाय पर्याय नाही असं सांगत राज्यात महायुतीला सर्वाधिक जागा मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.देवेंद्र फडणवीस यांनीही गेल्या दोन लोकसभा निवडणुकींच्या तुलनेत महायुतीला सर्वाधिक जागा मिळतील असं या पत्रकार परिषदेत सांगितलं. महायुतीतल्या तिन्ही पक्षांमध्ये सन्मानजनक जागावाटप होईल असं ते म्हणाले. महायुतीत जागांसंदर्भात ८० टक्के तोडगा निघाला आहे उर्वरित २० टक्के प्रश्न लवकरच सोडवला जाईल , असं फडणवीस यांनी सांगितलं.उद्धव ठाकरे सीएए वर टीका करत आहेत, त्यांनी यासंदर्भात भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी फडणवीस यांनी यावेळी केली.
उद्धव ठाकरे यांनीं तुष्टीकरणाचं धोरण अवलंबलं आहे,एका विशिष्ट समाजाला खुश करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आपली सीएए बद्दलची भूमिका बदलली आहे अशी टीका फडणवीस यांनी यावेळी केली.










































































