Last Updated on 09 Mar 2024 10:15 PM by Sanjay Patil/Adhorekhit
क्षारपड जमीन सुधारणा,जमिनीची सुपीकता वाढवत उत्पादन वाढविणे हा उत्तम पर्याय
सांगली । एका बाजूला शेतातील खर्च दिवसेंदिवस वाढत असताना दुसऱ्या बाजूला जमिनीची उत्पादकता कमी होऊन उत्पादन कमी येत आहे.मग शेती कशी परवडणार? यावर क्षारपड जमीन सुधारणा,जमिनीची सुपीकता वाढवित शेतातील उत्पादन वाढविणे हा उत्तम पर्याय आहे,असा विश्वास युवा नेते,राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी व्यक्त केला.
गाताडवाडी येथे राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या समृध्द भूमी अभियान अंतर्गत सभेत ते बोलत होते. या वेळी लोणारवाडी,अहिरवाडी,तुजारपूर आणि गोटखिंडी येथील शेतकरी,तसेच ‘राजारामबापू’चे उपाध्यक्ष विजयराव पाटील, माजी पं.स.सभापती नेताजीराव पाटील, माजी जि.प.उपाध्यक्ष रणजित पाटील,जल सिंचन समितीचे अध्यक्ष प्रदीपकुमार पाटील, शेती समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, संचालिका प्रा.डॉ.योजना शिंदे-पाटील,प्रताप पाटील,राजकुमार कांबळे,शैलेश पाटील, हणमंत माळी उपस्थित होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज,लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
प्रतीक पाटील म्हणाले,आपण ३५-४० वर्षांपूर्वी माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला आणि आपल्या शिवारात पाणी आले. त्यातून आपला तालुका एक प्रगत व समृद्ध तालुका म्हणून राज्यात पुढे आला. आता मलाही आपली साथ द्या,समृध्द भूमी अभियानमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हा, आम्ही तालुक्यातील क्षारपड जमीन पिकवू करून पुन्हा तालुक्याच्या आर्थिक प्रगतीस चालना देऊ. आपल्या खिशास तोषिस न लागता ५ वर्षात वाढीव उत्पादनांतून क्षारपड शेती पिकवू करण्याचा आणि कायम जिवंत ठेवण्याचा हा आमचा प्रयत्न आहे.
ऊस विकास अधिकारी सुजयकुमार पाटील,जल सिंचन अधिकारी जे.बी.पाटील यांनी जमिनी क्षारपड कशा झाल्या,त्या कशा दुरुस्त केल्या जाऊ शकतात,तसेच राजारामबापू साखर कारखान्याच्या विविध योजनाबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी
रोहित नांगरे,रमेश जाधव,तुजारपूरचे श्रीकांत पाटील यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी निचरा प्रणालीबद्दल प्रश्न विचारत अधिक माहिती करून घेतली.
प्रारंभी भैरवनाथ पाणी पुरवठा संस्थेचे अध्यक्ष रमेश खोत यांनी स्वागत,तर सरपंच आनंदी खोत यांनी प्रास्ताविक केले. यावेळी उप सरपंच संदीप करांडे,जयंत पाणी पुरवठा संस्थेचे अध्यक्ष धनाजी खट्टे,सोसायटीच्या अध्यक्षा रुक्मिणी शिंदे,सचिन खोत,मोहन करांडे,पोपट खोत,विकास खोत,जालिंदर जाधव,आनंदा जमदाडे,स्वाती खोत,प्रमिला खोत,किरण खोत,विशाल खोत,गोटखिंडीचे सागर डवंग,विनायक पाटील,तुजारपूरचे संतोष पाटील,महेश पाटील,अहिरवाडीचे शशिकांत कदम यांच्यासह चार गावचे शेतकरी उपस्थित होते. युवा कार्यकर्ते सुहास खोत यांनी आभार मानले.









































































