सांगली । राजारामनगर (इस्लामपूर) येथील राजारामबापू इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुषांच्या (दुहेरी) खुल्या गटात सांगलीचे शुभम पाटील,निनाद अन्यापनावर यांनी प्रथम क्रमांक,तर इस्लामपूरचे तेजस शिंदे,अभिषेक जाधव यांनी दुसरा क्रमांक पटकाविला आहे. विजेत्या खेळाडूंना राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील,सातारा तहसिलदार मैनूनिसा सय्यद, प्रा.डॉ.नितीन शिंदे,उद्योजक सतिश गुरव,राजारामबापू इनडोअर स्टेडियमचे मुख्य प्रशिक्षक सचिन भिलारे यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.
युवा नेते,राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त दोन दिवस,मोठ्या उत्साहात ही स्पर्धा
पार पडली.
स्पर्धेतील विजेते-९ वर्षाखालील मुले (एकेरी)- प्रथम क्रमांक-इझहान सय्यद, द्वितीय क्रमांक-वल्लभ बोंगाळे,मुली (एकेरी)- प्रथम क्रमांक- स्पंदन मगदूम,द्वितीय क्रमांक- श्रीशा भिलारे,११ वर्षाखालील मुले (एकेरी)- प्रथम क्रमांक- आर्यन माडवी,द्वितीय क्रमांक- हर्षवर्धन पाटील,मुली(एकेरी)- प्रथम क्रमांक- मैथिली तरसे,द्वितीय क्रमांक-आराध्या पवार,
१३ वर्षाखालील मुले (एकेरी)- प्रथम क्रमांक- सार्थ माने,द्वितीय क्रमांक-विष्णु लोकरे, मुली(एकेरी)- प्रथम क्रमांक-क्षितिजा पाटील, द्वितीय क्रमांक-मनाली कीर्तने,१५ वर्षा खालील- मुले (एकेरी) प्रथम क्रमांक-समर्थ सावंत,द्वितीय क्रमांक-ईशान मांडवी, मुली (एकेरी)-क्षितिजा पाटील,समिक्षा माने,
१५ वर्षाखालील मुले (दुहेरी)-प्रथम क्रमांक- शर्वील शिंदे,प्रथमेश पाटील,द्वितीय क्रमांक- सार्थ माने,विष्णू लोखंडे.३५ वर्षाखालील पुरुष-(दुहेरी)-प्रथम क्रमांक-सचिन भिलारे, जितेंद्र चौंदज,द्वितीय क्रमांक-अमोल पवार, डॉ.कपिल घोरपडे,४५ वर्षाखालील पुरुष- (दुहेरी)-प्रथम क्रमांक-वैभव आंबी,रमेश चव्हाण,द्वितीय क्रमांक-अमोल पवार व डॉ. नितीन शिंदे
पंच म्हणून आदित्य जायभाये,मानसी पवार,राहुल पाटील,ओंकार लोखंडे,भावेश पटेल,हर्षवर्धन घार्गे यांनी जबाबदारी पाहिली. अमोल पवार,महादेव सूर्यवंशी,विकास पाटील,धनाजी माने,अँड.विशाल कीर्तने, प्रमोद पाटील,सदाशिव सिध्द,श्रीकांत सावंत यांच्यासह स्टेडियमच्या खेळाडूंनी स्पर्धेचे उत्तम संयोजन केले.