Last Updated on 29 Feb 2024 5:25 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ग्रामीण भागातील माता-भगिनी,युवती मोठ्या उत्साहाने महोत्सवात सहभागी
सांगली । वाळवा तालुक्यासह मिरज पश्चिम भागातील डिग्रज सर्कलमधील सुमारे २० हजार महिलांनी ‘जयंत महोत्सव’चा मनमुराद आनंद लुटला. ग्रामीण भागातील माता-भगिनी,युवती मोठ्या उत्साहाने महोत्सवात सहभागी झाल्या.त्या हसल्या-खेळल्या,त्यांनी आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त केल्या. या हजारो महिलांच्या चेहऱ्यावरील हास्य हे जयंत महोत्सवाचे मोठे यश असल्याचा विश्वास महिला राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षा सुनिता देशमाने यांनी वाटेगाव येथील समारोप समारंभात व्यक्त केला. युवा नेते प्रतिकदादा पाटील,सौ.अलिका पाटील यांचे पाठबळ आणि महिला सहकारी,तसेच मा.साहेबांच्या वर प्रेम करणाऱ्या गावोगावच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने आम्ही हा महोत्सव यशस्वी पणे राबवू शकलो,असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष,माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वाळवा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १२ जि.प. मतदारसंघात ‘जयंत महोत्सव’ आयोजित केला होता. महिलांचे हळदी-कुंकू,तिळगुळ व वाण वाटप आणि ३ तास महिलांचे निखळ मनोरंजन असे महोत्सवाचे स्वरूप होते.
‘बाईपण,भारी देवा’हे ब्रीद घेवून कामेरी येथून महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. बावची,वाळवा,बागणी,डिग्रज सर्कल, बोरगाव,रेठरे हरणाक्ष,पेठ,चिकूर्डे,येलूर, कासेगाव करीत वाटेगाव येथे समारोप करण्यात आला. प्रसिध्द समालोचक मोनिका करंदीकर,नितीन गवळी यांनी छोटे-छोटे खेळ,विनोदी किस्से,उखान्यातून महिलांना दिलखुलास हसविले आणि महिलाही तितक्याच मिसळून गेल्या. प्रत्येक महोत्सवात ३ पैठणी,५० आकर्षक बक्षिसे देण्यात आली.
जिल्हाध्यक्ष सुस्मिता जाधव,प्रदेश सरचिटणीस छायाताई पाटील,प्रदेश सदस्या कमल पाटील,सुजाता पाटील,सदस्या रूपाली ढोकळे,अलका माने,रेखा पवार,सरिता पाटील,स्वाती कदम,वैशाली निकम,जयश्री पवार,कल्पना कोळेकर,संगीता पाटील,मेघा पाटील,सायली गोंदील यांच्यासह शेकडो महिला कार्यकर्त्यांनी जयंत महोत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.










































































