स्वाभिमानीचे नेते भागवत जाधव यांची माहिती
बहे पुलानजीक धारा रिसॉर्ट येथे शिबिराचे आयोजन
सांगली । लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसाठी माजी खा. राजु शेट्टी यांच्या उपस्थितीत दि. 2 मार्च रोजी एक दिवसीय अभ्यास शिबीर आयोजित केल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भागवत जाधव यांनी दिली
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील वाळवा व शिराळा तालुक्यांचा समावेश आहे.लोकसभा निवडणूकीच्या पार्शवभूमीवर हातकणंगले लोकसभा निवडणुकीच्या पूर्व तयारीसाठी माजी खा. राजु शेट्टी यांच्या उपस्थितीत स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांसाठी शनिवारी एक दिवसीय अभ्यास शिबीर आयोजित करण्यात आले असून हे शिबीर बहे – तांबवे रस्त्यावर बहे पुलानजीक असणाऱ्या धारा रिसॉर्ट येथे शनिवारी सकाळी 10 वाजता होणार आहे.यावेळी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालिंदर पाटील,जिल्हाध्यक्ष पोपट मोरे,पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे,कार्याध्यक्ष संदीप राजोबा.युवा आघाडीचे संजय बेले, प्रवक्ते ॲड.एस्.यु.संदे,तानाजी साठे,शिराळा राम पाटील,देवेंद्र धस,मानसिंगराव पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी जाधव म्हणाले की,माजी खा. राजु शेट्टी हे हातकणंगले लोकसभा लढवणार आहेत.स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या ऊस आंदोलनामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील सुमारे पंधरा लाख शेतकऱ्यांना सुमारे ६५० कोटी रुपयांचा फायदा झाला आहे.यामुळे राजू शेट्टी यांचा विजय निश्चित आहे.
ते म्हणाले, वाळवा व शिराळा तालुक्यातील बुथनिहाय माहिती,बुथ रचना,सभा नियोजन व मतदारसंघात व्यूहरचना अशा विविध विषयावर या शिबिरात चर्चा होणार आहे. यावेळी प्रा. संजय थोरात यांच्यासह विविध मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.शिवाजीराव पाटील,दत्ताजी पाटील,शंकरआण्णा पाटील,उत्तम पाटील,रामचंद्र जाधव,रवीकिरण माने,संतोष शेळके आदींसह कार्यकर्ते या शिबिराचे नियोजन करत आहेत.