सांगली । इस्लामपूर येथील प्रकाश पब्लिक स्कूलचे प्राचार्य डॉ. मधुकुमार नायर यांना ‘चेंजमेकर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.डॉ. नायर यांनी प्रकाश शिक्षण संकुलातील प्रकाश पब्लिक स्कूलमध्ये माहिती तंत्रज्ञानमधील रोबोटीक्स,कोडींग,डिजिटल साक्षरता यांचा शैक्षणिक कार्यात समावेश करून शाळेमध्ये नाविन्यपूर्ण सुधारणात्मक बदल घडवून आणून शाळेचा देशपातळीवर नावलौकिक केला.
त्यांच्या या कार्याची दखल सायबर स्केवर,युके यांनी घेतली आणि दुबई येथे सदभावना ग्रुप ऑफ एज्युकेशन युएईचे सी.ई.ओ डॉ हँरिस व सायबर स्केवर, युकेचे सी.ई.ओ डॉ प्रदीप ए यांच्या हस्ते डॉ. नायर यांना ‘चेंजमेकर’ पुरस्काराने सन्मानित केले.
डॉ. नायर यांच्या शैक्षणिक कार्यामुळे शाळेचा नावलौकिक झालेला आहे.त्यांचे कार्य खरचं कौतुकास्पद व सर्वांसाठी प्रेरणादायी आहे त्यांना मिळालेल्या या सन्मानाने प्रकाश शिक्षण संकुलामध्ये मानाचा तुरा रोवला गेला आहे असे प्रकाश शिक्षण संकुलाचे संस्थापक निशिकांत भोसले-पाटील म्हणाले.शाळेच्या प्रशासिका सौ सुनिता निशिकांत भोसले – पाटील प्राचार्य डॉ.नायर तसेच सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गांनी अभिनंदनपर शुभेच्छा दिल्या .