Last Updated on 20 Feb 2024 12:55 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने आज विशेष अधिवेशन बोलावले आहे.या अधिवेशनात मराठा आरक्षणासाठी कायदा केला जाणार आहे.मात्र, त्याआधी राज्य सरकारने मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिले आहे.मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली.या बैठकीत मराठा समाजाला नोकरीत आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.












































































