Last Updated on 18 Feb 2024 8:15 PM by Sanjay Patil/Adhorekhit
शर्यती शौकिनांनी हा बैलगाडी शर्यतींचा थरार पाहिला याची डोळा,याची देही
सांगली । कासेगाव (ता.वाळवा) येथील ऐतिहासिक,अद्भुत आणि अविस्मरणीय ‘जयंत केसरी बैलगाडी शर्यती’च्या दुसऱ्या पर्वाच्या प्रथम क्रमांकाच्या वन बीएचके फ्लॅटचा मानकरी पै.सचिनशेठ चव्हाण वाई यांचा ‘रायफल्या ८१८१’आणि उमेशशेठ हरफळे,अमितशेठ पाडळी,अधिक पैलवान कळंबी यांचा ‘शंभू’ही जोडी ठरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष,माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी स्वतः दोन-अडीच तास बैलगाड्यांच्या शर्यतीचा थरार पहात विजेत्या संघांना बक्षीस वितरण केले.
मुख्य संयोजक,युवा उद्योजक अतुलभाऊ लाहिगडे,सांगली जिल्हा परिषदे चे माजी अध्यक्ष देवराज पाटील,इस्लामपूरचे माजी नगरसेवक खंडेराव जाधव प्रामुख्याने उपस्थित होते.संपूर्ण राज्यातील लाखो बैलगाडी शर्यती शौकिनांनी हा बैलगाडी शर्यतींचा थरार याची डोळा,याची देही पाहिला.. देशाच्या,राज्याच्या बैलगाडी शर्यतीच्या इतिहासात कासेगावची बैलगाडी शर्यत सुवर्णाक्षरांनी लिहिली जाईल,असे गौरवोद्गार आ.जयंतराव पाटील काढले. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आ. मानसिंगभाऊ नाईक,युवा नेते रणधीर नाईक यांनी स्पर्धेस सदिच्छा भेट दिली.
युवा उद्योजक अतुल लाहिगडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्व.शरदअण्णा लाहिगडे फौंडेशन (महाराष्ट्र राज्य ) व बैलगाडी संघटना,कासेगाव यांच्या वतीने आ.जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त सलग दुसऱ्या वर्षी या शर्यतीचे अतिशय देखणे आयोजन करण्यात आले होते
दुसऱ्या क्रमांकाचे रुपये ६ लाख ६,२६५ चे बक्षीस अमोल पैलवान वाटेगावकर यांचा ‘सर्जा’,आणि किरण राऊत बदलापूर,निखिल काळे येरवळेकर यांचा ‘हरण्या’यांनी, तिसऱ्या क्रमांकाचे रुपये ३ लाख ६,२६५ चे बक्षीस पिंटूशेठ मोडक, वडकी व अजयशेठ पाटील, दरंगा यांचा ‘कॉकटेल’,जगदीशबापू शिंदे ऊरळी देवाची यांचा ‘पिस्टल’ यांनी,चौथ्या क्रमांकाचे रुपये २ लाख ६,२६५ चे बक्षिस अक्षय मोरे सातारा,राजू पाटील वाटेगाव,
यांचा ‘बलमा’, व मोहीलशेठ धुमाळ,सुसगाव, सचिनशेठ घरत यांचा ‘बकासुर’ यांनी,पाचव्या क्रमांकाचे रु.१ लाख ६,२६५ चे बक्षीस नितीनआबा शेवाळे हडपसर यांचा ‘बावऱ्या’,आणि ऋषभ गावडे नाशिक यांचा ‘गुरू’ यांनी,सहाव्या क्रमांकाचे रुपये ६२ हजार ६५ चे बक्षिस पंकज घाडगे शिरसवडी यांचा ‘रायफल’,मोहन मदने पेठ यांचा ‘राजा’ यांनी, सातव्या क्रमांकाचे रुपये ६२ हजार ६५ चे बक्षिस विजय मदने,संजय मदने नातेपुते यांचा ‘सरदार’आणि आनंदशेठ,वैभवशेठ, सर्वेशशेठ पाटील यांचा ‘वादळ’यांनी,आठव्या क्रमांका चे रुपये ५० हजार ६,२६५ चे बक्षीस विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन महादेवनगरकर यांचा ‘सरदार’व पप्पू ड्रायव्हर इस्लामपूर यांचा ‘सर्जा’यांनी जिंकले आहे. सुनिल मोरे पेडगाव, चंदू कोकाटे वडूज,प्रकाशबुवा महागावकर, रणजित बनसोडे बांबवडे,प्रविण घाटे पुणे यांनी अतिशय प्रभावी समालोचन केले. याप्रसंगी कु.शुभम राजकुमार पाटील (बांबवडे) याची मोठ्या कंपनीच्या अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल सत्कार केला.
कासेगाव-कराड या आशियाई महामार्गा च्या पश्चिम बाजूला हॉटेल आशिर्वादच्या मागे सुमारे ७० एकरात भव्य मैदान तयार केले होते. या शर्यतीमध्ये संपूर्ण राज्यातील नामवंत २०० बैलगाड्या स्पर्धकांनी भाग घेतला. सकाळी १०.३० वाजता शर्यतींचा थरार सुरू करण्यात आला. अलोट गर्दी व उदंड प्रतिसादात रात्री ८ पर्यंत मैदान चालले. भव्य व्यासपीठ,प्रशस्त मैदान,दोन्ही बाजूला बसण्यास गॅलरी,भव्य चार स्क्रीन,अद्यावत प्रकाश व ध्वनी यंत्रणा,५-६ रुग्ण वाहिका, आणि विशेष म्हणजे महिलांची स्वतंत्र बैठक व्यवस्था केली होती. हजारो महिलांनीही बैल गाड्या शर्यतींचा थरार अनुभवला. कासेगाव पोलीस स्टेशनचे सपोनि भालचंद्र देशमुख यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
नेताजीराव पाटील,शशिकांत पाटील, शहाजी पाटील,संजय पाटील,अतुल पाटील, पिरअली पुणेकर यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते. फौंडेशनचे कार्यकर्ते बंडासो देशमुख, विकास लाहिगडे,मकरंद माने, विक्रम गावडे,संजय लाहीगडे,सोमनाथ लाहिगडे,अक्षय लाहिगडे,अभिषेक दंडवते, जितेंद्र पाटील,बजरंग माळी,शरद शिनगारे, अनिकेत कुंभार,कन्हैया बोडरे,पोपट माने, विकास पाटील,काका पाटील,विजय काकडे, योगेश मोठे,महेश पाटील,विजय काकडे, राहूल देवकर,संभाजी पाटील, दिग्विजय सावंत,विनोद लाहिगडे,गणराज देशमुख, सुरज देशमुख,शार्दुल कुलकर्णी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी हे मैदान यशस्वी करण्यासाठी अतिशय कष्ट घेतले.










































































