कोल्हापूर । भारतीय शुगर या साखर उद्योगातील नामवंत संस्थेने राज्य साखर संघाचे अध्यक्ष,साखर उद्योगातील भीष्माचार्य पी.आर.पाटील यांना कोल्हापूर येथे शानदार सोहळ्यात ‘जीवन गौरव’या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले. सौ.रत्नकांता पाटील,नॅशनल शुगरचे संचालक नरेंद्र मोहन,भारतीय शुगरचे अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे,दत्त शिरोळचे अध्यक्ष गणपतराव पाटील,प्रशांत परिचारक,’राजारामबापू’ उपाध्यक्ष विजयराव पाटील,कार्यकारी संचालक आर.डी.माहुली प्रामुख्याने उपस्थित होते.
पी.आर.पाटील सत्कारास उत्तर देताना म्हणाले,राजर्षी शाहू महाराज,कर्मवीर भाऊराव पाटील,लोकनेते राजारामबापू पाटील यांना दैवते मानून ५० वर्षापेक्षा जास्त काळ सहकार व सार्वजनिक क्षेत्रात काम केले. माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी माझ्यावर प्रदीर्घ विश्वास दाखविला. मला राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचा अध्यक्ष म्हणून २८ वर्षे संधी मिळाली. मी कारखान्याच्या प्रगतीमध्ये काही योगदान करू शकलो. खा.शरदचंद्र पवार यांनी मला साखर संघाच्या अध्यक्ष पदाची संधी दिली असून या पुरस्काराने अधिक गतीने काम करण्यास ऊर्जा मिळेल.
याप्रसंगी संचालक बाळासाहेब पवार,विठ्ठल पाटील,कार्तिक पाटील,प्रदीपकुमार पाटील,रघुनाथ जाधव,बबनराव थोटे,माजी संचालक नारायण पाटील,विराज शिंदे,श्रेणिक कबाडे,माणिक शेळके,सचिव जनरल मॅनेंजर एस.डी.कोरडे,डी.एम.पाटील तसेच साखर उद्योगातील मान्यवर,कारखान्याचे संचालक,अधिकारी,तसेच नातेवाईक उपस्थित होते.