नवी दिल्ली | विविध विभागाअंतर्गत असलेल्या सध्याच्या रुग्णालय पायाभूत सुविधांचा उपयोग करत नवी वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यात येणार सध्याच्या रुग्णालय पायाभूत सुविधा तपासत वैद्यकीय महाविद्यालयांसाठी शिफारस करण्याकरिता समिती स्थापन करण्यात येणार आशा सेविका,अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना आरोग्य कवच युवा शक्तीवर लक्ष केंद्रित करत आणि 2047 पर्यंत विकसित भारत बनण्याचे उद्दिष्ट गाठण्याच्या दिशेने वाटचाल करतानाच आणखी वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्याची घोषणा केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024-25 या वर्षासाठी संसदेत अंतरिम अर्थ संकल्प सादर करताना केली.
विविध विभागाअंतर्गत असलेल्या सध्याच्या रुग्णालय पायाभूत सुविधांचा उपयोग करत नवी वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यात येणार आहेत. यासाठी सध्याच्या रुग्णालय पायाभूत सुविधा तपासत वैद्यकीय महाविद्यालयांसाठी शिफारस करण्याकरिता समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या नव्या वैद्यकीय महाविद्यालयांमुळे युवकांना डॉक्टर होण्याची संधी मिळण्याबरोबरच जनतेसाठी आरोग्य सेवेतही सुधारणा होणार आहे.
आशा सेविका,अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना आयुष्मान भारत योजने अंतर्गत आणण्याचेही निर्मला सीतारामन यांनी प्रस्तावित केले आहे.