मितेश घट्टे यांची पोलीस उपायुक्त-मुंबई शहर या पदावर बदली
मुंबई । राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. भारतीय पोलीस सेवा (IPS) आणि राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सरकारकडून जारी करण्यात आले आहेत.सांगलीच्या नूतन पोलिस अधीक्षकपदी संदीप घुगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.श्री. घुगे सध्या पदस्थापनेच्या प्रतीक्षेत होते सांगलीचे मावळते अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांची पदोन्नतीवर सीआयडी पुण्याच्या पोलिस उपमहानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट यांच्या सहीने याबाबतचे आदेश बुधवारी काढण्यात आले आहेत.
गडचिरोली विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांना नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.त्यांना पदोन्नती देण्यात आली आहे.अजयकुमार बन्सल जालना जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक असणार आहेत.यापूर्वी अजय कुमार बन्सल मुंबई विभागाचे पोलीस आयुक्त होते.पुणे पोलीस आयुक्त असणारे रितेश कुमार यांना पदोन्नती देत होमगार्डचे महासमादेशक पदी मुंबईत नियुक्ती देण्यात आली आहे.
नागपूर शहराचे पोलीस आयुक्त असणारे अमितेश कुमार हे आता पुणे शहराचे नवे पोलीस आयुक्त असणार आहेत.
वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक रविंद्र कुमार सिंघल हे नागपूर शहराचे पोलीस आयुक्त असणार आहेत.गडचिरोली विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांना बढती देण्यात आली असून नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. अजयकुमार बन्सल जालना जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक असणार आहेत. यापूर्वी अजय कुमार बन्सल मुंबई विभागाचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते.
या सर्व राज्यातील अधिका-यांच्या बदल्या खालीलप्रमाणे आहे.