Last Updated on 21 Jan 2024 9:42 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीराम मंदीरामध्ये आज (सोमवार) दुपारी १२ वाजता कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील,व त्यांच्या सुविद्य पत्नी अलिका पाटील यांच्या हस्ते पूजा व आरती केली जाणार आहे.श्रीराम मंदीर व परिसरात रंग- रंगोटी,साफ-सफाई,आकर्षक रोषणाई केली आहे.या आरती सोहळ्यास सर्व भाविक- भक्तांनी सहभागी व्हावे,असे आवाहन करण्यात आले.
अयोध्या (उत्तर प्रदेश) येथील श्रीराम मंदीरात मूर्तींची प्राण प्रतिष्ठापना केली जात आहे,त्याचे औचित्य साधून ही पूजा व आरती केली जाणार आहे. लोकेनते राजारामबापू पाटील यांनी ४२ वर्षापूर्वी कारखाना कार्य स्थळावर श्रीराम मंदीर बांधण्याची संकल्पना मांडून थोर विचारवंत वि.स.पागे यांच्या हस्ते १५ जुलै १९८२ साली या मंदीराच्या बांध कामाचे भूमिपूजन करण्यात आले. बापूंच्या अकाली निधनानंतर माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांनी साखर कारखान्या च्या अध्यक्ष पदाची धुरा हाती घेतल्यानंतर मंदीरा च्या बांधकाम पूर्ण केले.२५ ऑगस्ट १९८८ ला मंदीरामध्ये मूर्तींची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली.या मंदीरात राम नवमी सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. तसेच दरवर्षी मकर संक्रातीस हजारो महिला सितामाईस वाण वाहण्यासाठी मंदीरात येत असतात. गेल्या ३५ वर्षांपासून हे श्रीराम मंदीर जिल्ह्यातील,तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान ठरलेले आहे.
कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील, कार्यकारी संचालक आर.डी.माहुली,सचिव आर.डी.माहुली,कामगार कल्याण अधिकारी महेश पाटील,सिव्हिल इंजिनिअर प्रेमनाथ कमलाकर यांच्या सह कामगार व अधिकारी या कार्यक्रमाची जय्यत तयारी करीत आहेत.










































































