Last Updated on 19 Jan 2024 11:01 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । अयोध्येतील राम मंदिराचे 22 जानेवारी रोजी लोकार्पण करण्यात येणार आहे.यादिवशी राम मंदिरात राम लल्लाची प्राण प्रतिष्ठापना केली जाणार आहे.हा सोहळा देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.
या सोहळ्यानिमित्त केंद्र सरकारने अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केल्यानंतर आता महाराष्ट्रातही 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.महाराष्ट्रापूर्वी अनेक राज्यात या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.











































































