कीर्तन सुरू असताना मध्येच घोषणा झाली, अन्…
कीर्तन सुरू असताना मध्येच घोषणा झाली,
इथं शामराव कोण आहेत? त्यांनी तात्काळ घरी जावं,महत्वाचं काम आहे!
शामराव गडबडीने उठले.
त्यांची बायको म्हणाली,
बसा खाली,कीर्तनाला जातो म्हणून इकडेच आलाय का?
हे बघायचं होतं!
नवरा बायकोचं भांडण…
नवरा बायकोचं जोरदार भांडण झाल्यावर बायको रागाने माहेरी निघाली.
तिने रागात नवऱ्याला मेसेज पाठवला,
माझा नंबर delete करा!
नवऱ्याने मेसेज केला,
आपण कोण?
महाराज! तुमची माफी मागायला आलोय…
जंगलातील मोठया खड्ड्यात वाघ कोसळतो.
शेजारच्या झाडावरील माकड वाघाला म्हणते,आता लोक तुझे कातडे काढणार,दात आणि नखे यांच्या वस्तू बनवणार.
दरम्यान,झाडावरील फांदी मोडून माकड खड्ड्यात कोसळते.
माकड म्हणते,
महाराज!
तुमची माफी मागायला खाली आलो!
वाघच आहे तो!
हा तुमचा कुत्रा वाघासारखा दिसतो.
वाघच आहे तो!
पण,कुठे तरी प्रेमात पडला
आणि त्याचे तोंड कुत्र्यासारखे झाले…