Last Updated on 07 Jan 2024 8:19 PM by Sanjay Patil/Adhorekhit
बोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी आरोग्य शिबिरांचे उदघाटन
सांगली । लोकनेते राजारामबापू पाटील स्मृती आरोग्य शिबिरांचे आयोजन केलेले आहे.मंगळवार दि.९ जानेवारी २०२४ रोजी बोरगाव (ता.वाळवा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात माजी मंत्री आ.जयंतराव पाटील,यशवंतराव मोहिते सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ.सुरेश भोसले यांच्या उपस्थित आरोग्य शिबिरांचे उदघाटन करण्यात येणार आहे.’काळजी आरोग्याची,आपल्या माणसांची’या भावनेने ही शिबिरे आयोजित केली आहेत, सर्वांनी या आरोग्य शिबीरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांनी केले आहे.
वाळवा तालुक्यातील १३ व मिरज तालुक्यातील २ अशा १५ प्राथमिक आरोग्य केंद्रांत सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत ही आरोग्य शिबिरे होणार आहेत. या शिबिरात मोफत आरोग्य तपासणी,रक्त-लघवी,तसेच जरुरीप्रमाणे ई.सी.जी,रक्त साखर तपासणी, डोळे तपासणी,मोफत चष्मे वाटप,मोतीबिंदू शस्त्रक्रिया,ह्रदयरोग,स्त्रीरोग,अस्थिरोग, सर्जरी,कॅन्सर,नाक,कान,घसा व अन्य आजारांची तपासणी करून आवश्यकते नुसार मोफत औषधोपचार केला जाणार आहे. नामवंत व तज्ञ डॉक्टर रुग्णांची तपासणी आणि उपचार करणार आहेत.
खालील प्राथमिक आरोग्य केंद्रात ही आरोग्य शिबिरे होणार आहेत. दि.९ जानेवारी -बोरगाव,दि.१० जानेवारी-येडेमच्छिंद्र,दि.११ जानेवारी- वाळवा,दि.१२ जानेवारी-बावची, दि.१३ जानेवारी-बागणी,दि.१७ जानेवारी- कवठेपिरान,दि.१८ जानेवारी-कसबे डिग्रज, दि.१९ जानेवारी-कासेगाव,दि.२० जानेवारी- नेर्ले,दि.२१ जानेवारी-वाटेगाव,दि.२३ जानेवारी- पेठ,दि.२४जानेवारी-कामेरी,दि.२५ जानेवारी- येलुर,दि.२७ जानेवारी- कुरळप,दि.२८ जानेवारी-चिकुर्डे.
राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील, देवराज पाटील,कार्तिक पाटील,प्रदीपकुमार पाटील,विठ्ठल पाटील,कार्यकारी संचालक आर.डी. माहुली,डॉ.प्रकाश महाळुंगकर यांच्यासह कारखान्याचे संचालक-अधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील अधिकारी या शिबिराचे आयोजन करीत आहेत.









































































