Last Updated on 01 Jan 2024 1:04 PM by Sanjay Patil/Adhorekhit
जय राम श्रीराम गजराने शहर भक्तीमय
सांगली । इस्लामपुर शहरात अयोध्यावरुन आलेल्या कलशाचे पुजन शहरातील वाकोबा मंदिरात मोठ्या भक्तीभावाने,श्रीरामा च्या जयघोषाने करण्यात आले.यावेळी माजी मंत्री आण्णासाहेब डांगे यांच्या हस्ते श्रीरामाच्या कलशाचे पुजन व आरती करण्यात आली.यावेळी भाजपाचे सांगली जिल्हा अध्यक्ष निशिकांत भोसले – पाटील,आ.जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
शहरातील वाकोबा मंदीर फुलांनी व विद्युत रोषणाईने सजविले होते.या मंदिरामध्ये अयोध्यावरुन आलेल्या कलशाचे व अक्षताचे पुजन मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात करण्यात आले.

यावेळी भाजपाचे जिल्हा अध्यक्ष म्हणाले, ४०० वर्षाहुन अधिक वर्षे आयोध्देत राममंदिर उभा करण्यासाठी संघर्ष करावा लागला.२२ जानेवारी अयोध्यामध्ये श्री रामलल्ला च्या मुर्ती ची प्रतिष्ठापना होत आहे.ही देशासाठी व जगभरातील अनेक नागरीकांना याचा अभिमान वाटावा असा हा दिवस आहे.शहरातील प्रत्येक घरात या अक्षता पोहचविण्याची जबाबदारी प्रत्येक रामाचा भक्त घेणार आहे,हा दिवस उत्सव म्हणुन मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात येत आहे. शहरातील प्रत्येक नागरीक हा दिवस दिपावली उत्सव म्हणुन साजरा करणार आहे.या उत्सव सर्व धर्मातील घटकांचा आहे सर्वानी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन शेवटी निशिकांत भोसले- पाटील (दादा) यांनी केले
यावेळी पहिल्या दिवशी अक्षता वाटप शहरातील हाजारो घरामध्ये करण्यात आले दि.१५ जानेवारी पर्यत शहरातील प्रत्येक पोहचतील,शहरासह प्रत्येक गावात दि.२२ जानेवारीच्या श्री रामा मुर्ती प्रतिष्ठापना चे थेट प्रेक्षेपण दाखविण्यात येणार आहे.
यावेळी संजय भागवत,राजेश मंत्री,वाळवा तालुका भाजपाचे अध्यक्ष निवास पाटील,माजी नगरसेवक वैभव पवार,गजानन फल्ले,भास्कर मोरे,दादासाहेब रसाळ,संदिप सावंत,प्रविण परीट,संजय हवलदार,अजित पाटील,अक्षय पाटील,तुषार भुतकर,मानसिंग पाटील आदींसह मान्यवर भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.











































































