सांगली । इस्लामपूर येथील प्रकाश पब्लिक स्कूलने श्री .ए. बी .पाटील स्कूल सांगली आयोजित येलो कॉनक्लेव्ह कार्निवलमध्ये सलग दुसऱ्या वर्षी बाजी मारली.
श्री. ए. बी .पाटील स्कूल सांगली आयोजित ‘येलो कॉनक्लेव्ह कार्निवल’ 2023- 24 दि. 21 व 22 डिसेंबर रोजी श्री. ए. बी.पाटील स्कूल सांगली येथे पार पडले.या कार्निवलमध्ये सांगली,सातारा,कोल्हापूर जिल्ह्यातील विविध शाळांनी सहभाग घेतला होता.या कार्निवलमध्ये,समूहगीत,जाहिरात सादरीकरण,देशभक्तीपर नृत्य,रांगोळी,फेस पेंटिंग व बुके डेकोरेशन,टाकाऊपासून टिकाऊ,फ्लेमलेस कुकिंग,हास्य हंगांमा,शिक्षक अंताक्षरी यासारख्या विविध दहा स्पर्धांचे कार्निवल मध्ये आयोजन केले होते .
प्रकाश पब्लिक स्कूलने जाहिरात सादरीकरण,हास्य हंगामा,समूहगीत, फ्लेमलेस कुकींग व देशभक्तीगीत नृत्य या पाच स्पर्धेत प्रथम क्रमांक,फेस पेंटिंग स्पर्धेत द्वितीय क्रमांक व रांगोळी स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला.प्रकाश पब्लिक स्कूलने दहापैकी आठ स्पर्धेत क्रमांक पटकावून चॅम्पियन ट्रॉफी वर सलग दुसऱ्या वर्षी आपले नाव कोरले .
या स्पर्धेमध्ये प्रकाश पब्लिक स्कूलचे संस्थापक निशिकांत भोसले-पाटील, प्रकाश पब्लिक स्कूलच्या प्रशासिका सौ. सुनीता निशिकांत भोसले-पाटील, प्रकाश पब्लिक स्कूलचे प्राचार्य डॉ.मधु कुमार नायर, उपप्राचार्या सौ. सिंधू नायर, संगीत शिक्षक सोमनाथ सुतार व देवानंद पाटील, कलाशिक्षिका सौ. गौरी अपुगडे, सांस्कृतिक विभाग सदस्य संग्राम पवार, सौ भाग्यश्री खट्टे, समीर बिश्वास, सौ.कृष्णप्रिया.ए व इतर शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचे मार्गदर्शन लाभले.