Last Updated on 17 Dec 2023 4:30 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत क्रिकेटचा आनंद घेतला.यावेळी ते जबरदस्त फलंदाजी करताना दिसले.यादरम्यान, मुख्यमंत्र्यांची बॅटीग पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.
संपूर्ण स्वच्छता मोहीम (डीप क्लिनिंग ड्राइव्ह) अंतर्गत, मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या चार परिमंडळातील चार प्रशासकीय विभागामध्ये (वॉर्ड) स्वच्छता मोहीमेचे आयोजन करण्यात आले.
त्याचवेळी टिळकनगर येथील मैदानावर खेळाडूंशी संवाद साधत स्वच्छता अभियानाचे महत्त्व पटवून देण्याचे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.टिळकनगर मैदान येथे मुले क्रिकेट खेळत असताना मुख्यमंत्री शिंदे यांनाही क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.बॅटिंग करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार फटकेबाजी केली.मुख्यमंत्री शिंदे हे फलंदाजी करत असताना बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी यष्टीरक्षण केले.
हेही वाचा – नागपूर शहरात सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीत स्फोट, नऊ कामगारांचा मृत्यू
यावेळी कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री श्री. मंगल प्रभात लोढा, खासदार मनोज कोटक, खासदार राहुल शेवाळे, आमदार राम कदम, आमदार कालिदास कोळंबकर, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, अतिरिक्ति आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, व अन्य मान्यवर उपस्थित होते.











































































