सांगली । बहे (ता. वाळवा) येथील सुरेश सुभाष पाटील व प्रशांत महादेव कोळी यांना शनिवारी आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.सांगली जिल्हा परिषदेच्या वतीने नुकतेच आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर करण्यात आले.आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल दोघांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
सांगलीवाडी येथील फल्ले मंगल कार्यालय येथे सुरेश पाटील व प्रशांत कोळी यांना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विठ्ठल चव्हाण,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे,सहायक गट विकास अधिकारी अविनाश पाटील यांच्यासह गट विकास अधिकारी,विस्तार अधिकारी,ग्राम विकास अधिकारी,विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा – सांगली : जिल्ह्यातील या ग्रामसेवकांना मिळाला ‘आदर्श ग्रामसेवक’ पुरस्कार
सुरेश पाटील यांना बनेवाडी येथे कार्यरत असताना पुरस्कार मिळाला.सन 2019-20 वर्षासाठी हा पुरस्कार मिळाला आहे.सध्या ते साखराळे व बनेवाडी येथे ग्रामविकास विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
तर प्रशांत कोळी यांना मोहिते वडगांव येथे कार्यरत असताना पुरस्कार मिळाला.सन 2012-13 वर्षासाठी हा पुरस्कार मिळाला आहे.सध्या ते अंबक व शिरगांव येथे कार्यरत आहेत.