सांगली । महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष व राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांच्या संकल्पनेतून बोरगाव येथे वाळवा तालुक्यातील १८ शाळांमधील १६५ खेळाडूंचे तीन दिवसांचे मोफत निवासी व्हॉलीबॉल प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. बोरगाव येथील हिंदमाता शिक्षण मंडळ व सांगली जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेने या निवासी शिबिराचे संयोजन केले.ग्रामीण भागातील प्रशिक्षणार्थी खेळाडूंनी या मोफत निवासी शिबाराबद्दल समाधान व्यक्त केले.
सांगली जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेचे उपाध्यक्ष मोहन पाटील यांच्या हस्ते व हिंदमाता शिक्षण मंडळाचे संचालक अभिजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिबिराचे उदघाटन करण्यात आले. तालुका क्रीडाधिकारी जमीर अत्तार,सांगली जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेचे सचिव डॉ.संदीप पाटील, हिंदमाता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मारुती पाटील,उपाध्यक्ष शांताराम पाटील,मानद सहसचिव संजय पाटील,संस्थेचे संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी,विविध शाळांचे मुख्याध्यापक,क्रीडा शिक्षक उपस्थित होते.
या शिबिरात बोरगाव,जुनेखेड,नवेखेड, मसुचीवाडी,बहे,रेठरेहरणाक्ष,हुबालवाडी, नरसिहपूर,शिरटे,येडेमच्छिंद्र,भवानीनगर, ताकारी आदी गावातील खेळाडू व क्रीडा शिक्षकांनी सहभाग घेतला. सकाळच्या सत्रात योग,शारीरिक व्यायाम,दुपारच्या सत्रात व्हॉलीबॉल खेळाची कौशल्ये प्रशिक्षण आणि सायंकाळी उदयराज पाटील यांचे कथाकथन, डॉ.प्रकाश बुरुटे यांचे फनी गेम्स व शरद पाटील यांची मिमिक्री घेण्यात आली. राष्ट्रीय खेळाडू सुरज पवार,अथर्व ढोबळे,अभिनव पवार,देवेंद्र लोळगे यांनी खेळाडूंना प्रशिक्षण दिले. शशिकांत माने (साखराळे) यांनी योगाचे महत्व सांगितले.
व्हॉलीबॉलचे राष्ट्रीय प्रशिक्षक आणि पंच राजेंद्र सातपुते,हिंदमाता शिक्षण संस्थेचे संचालक अभिजित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराची सांगता करण्यात आली. राजेंद्र सातपुते म्हणाले,ग्रामीण भागातील मुलांच्याकडे प्रचंड गुणवत्ता आहे. त्यांना अद्यावत प्रशिक्षण दिल्यास त्यांच्यातून राष्ट्रीय खेळाडू घडू शकतात. अभिजीत पाटील म्हणाले,युवा नेते प्रतिकदादा पाटील यांच्या संकल्पनेतून आम्ही हे शिबीर घेतले. या शिबिराचा निश्चितच ग्रामीण भागातील खेळाडूंना मोठा लाभ होईल. आमचा दर महिन्याला एक दिवसीय शिबीर घेण्याचा प्रयत्न आहे. खेळाडू प्रथमेश इरकर,अवधूत कदम,क्रीडा शिक्षक शरद कुऱ्हाडे,उदयसिंह पाटील,जी.एल.दांडेकर,राहुल भोई यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी खेळाडूंना गणवेश प्रशस्तीपत्र वाटप करण्यात आले.
डॉ.सचिन पाटील,विक्रम देशमुख,अमोल खोत,उदयसिंह पाटील,प्रकाश पाटील,सुहास जगताप,तसेच हिंदमाता शिक्षण संकुलातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.