Last Updated on 06 Dec 2023 7:23 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । मराठा आरक्षणासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इस्लामपूर तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या साखळी उपोषणात मंगळवारी बहे ग्रामस्थांनी सहभाग घेतला.बहे येथील पदाधिकाऱ्यांसह अनेक ग्रामस्थ या बेमुदत साखळी उपोषणात सहभागी झाले होते.
इस्लामपूर येथील तहसील कार्यालयासमोर मराठा आरक्षणासाठी १ डिसेंबरपासून साखळी उपोषण सुरू आहे.या बेमुदत साखळी उपोषणात तालुक्यातील दररोज एक गाव सहभागी होत आहे.बहे येथील ग्रामस्थ सहभागी झाले होते.राजारामबापू कारखान्याचे संचालक विठ्ठलराव पाटील,माजी संचालक माणिकराव पाटील,कृष्णा बँकेचे संचालक शिवाजी पाटील,सरपंच संतोष दमामे, माजी उपसरपंच मनोज पाटील,भगवान पाटील,प्रा.शशिकांत पाटील,उदयसिंह पाटील,अधिक दमामे,अभिजित पाटील,विनायक पाटील,राजाराम थोरात,संजय यादव,किर्तिकुमार पाटील,प्रतिकेश थोरात,रोहित पवार,विकास मोहिते,शहाजी पाटील,जयंत कृष्णमूर्ती आदी सहभागी झाले होते.इस्लामपूर वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेटून पाठिंबा दिला.ॲड. धनंजय पाटील,ॲड. अर्जुन पवार,ॲड. जगदीश थोरात,ॲड.गजानन वाघ,ॲड.रवींद्र पाटील,ॲड.क्रांती पाटील आदी उपस्थित होते.












































































