Last Updated on 05 Dec 2023 8:42 PM by Sanjay Patil/Adhorekhit
जयंत गणेशोत्सव स्पर्धेतील विजेत्या मंडळांचा आ.जयंत पाटील यांच्या हस्ते गौरव
सांगली । विविध सण,उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक ऐक्य सांभाळत सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या युवक मंडळांना अधिक प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न राहील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष,माजी मंत्री आ.जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथील कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व राजारामबापू ज्ञान प्रबोधिनीच्या वतीने आयोजित जयंत गणेशोत्सव स्पर्धेतील वाळवा तालुक्यासह इस्लामपूर व आष्टा शहरातील विजेत्या मंडळांना आ.पाटील यांच्या हस्ते रोख रक्कम व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.याप्रसंगी प्रा. शामराव पाटील,विजयराव पाटील,शहाजी पाटील,अँड.चिमण डांगे, संग्राम जाधव,देवराज पाटील,संजय पाटील, बाळासाहेब पाटील,सौ.सुस्मिता जाधव, सुभाषराव सुर्यवंशी,खंडेराव जाधव,देवराज देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
वाळवा तालुक्यात पदवीधर मित्र मंडळ कवठेपिरान,इस्लामपूर शहरात जय हनुमान गणेश मंडळ (काळा मारुती चौक) ,तर आष्टा शहरात अमर मैत्री गणेश मंडळ (गांधी चौक) या मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

स्पर्धेचा निकाल – वाळवा तालुका (ग्रामीण)- दुसरा-सिध्देश्वर बावची,तिसरा- शिवशंभू दुधगाव,चौथा-जय धर्मनाथ वाटेगाव,पाचवा-अजिंक्य बोरगाव. इस्लामपूर शहर-दुसरा-कला सागर बुरुड गल्ली, तिसरा- अण्णासाहेब डांगे चौक कचरे गल्ली, चौथा- साई गणेश मंडळ उरूण भाग, पाचवा- सिध्दनाथ जोगेश्वरी उरूण भाग. आष्टा शहर-दुसरा-श्रीमंत चव्हाणवाडी,तिसरा- सिंहासन आटूगडे मळा,चौथा-शिवप्रताप घोरपडे गल्ली,पाचवा-क्षत्रिय,बाजारवाडी. तसेच वाळवा तालुका(ग्रामीण),इस्लामपूर शहर व आष्टा शहरातील अनेक मंडळांना उतेजनार्थ बक्षिस देऊन गौरविण्यात आले.प्राचार्य प्रदीप पाटील व तालुक्यातील १५ कला शिक्षकांनी स्पर्धेचे परीक्षण केले. त्यांचाही सन्मान करण्यात आला.
शहाजी पाटील म्हणाले,युवा नेते प्रतिकदादा पाटील यांच्या संकल्पनेतून युवक मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी संपूर्ण तालुक्यात ही स्पर्धा घेण्यात आली असून युवक मंडळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. यावेळी युवकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
प्रारंभी संग्राम जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.भिमराव पाटील,अँड. विश्वासराव पाटील,संग्राम फडतरे,शिवाजी चोरमुले,माणिक शेळके,पै.भगवान पाटील, माणिकराव पाटील,शंकरराव चव्हाण,शैलेश पाटील,अरुण कांबळे,स्वरूप मोरे,राजकेदार आटूगडे यांच्यासह वाळवा तालुका,इस्लामपूर शहर व आष्टा शहराचे पदाधिकारी व कार्यकर्ते,तसेच युवक मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. देवराज देशमुख यांनी आभार मानले. विनायक जगताप,प्रशांत कदम यांनी सूत्रसंचालन केले.










































































