Last Updated on 05 Dec 2023 7:54 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । आविष्कार कल्चरल ग्रुपच्या वतीने शनिवार दि.९ डिसेंबर सायंकाळी ७ वाजता लिटल चॅम्प फेम,युवा पार्श्वगायक रोहित राऊत व जुईली जोगळेकर यांचा “आर.जे. लाईव्ह इन कॉन्सर्ट” हा हिंदी-मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम होणार असल्याची माहिती आविष्कारचे अध्यक्ष सुनिल चव्हाण आणि सचिव विश्वनाथ पाटसुते यांनी दिली. इस्लामपूर येथील खा.एस.डी.पाटील नगरा तील विद्यामंदीर हायस्कुलच्या प्रांगणात हा कार्यक्रम संपन्न होणार असून हा २१ व्या महोत्सवातील तिसरा (शेवटचा) कार्यक्रम असल्याचेही त्यांनी सांगितले.
माजी मंत्री आ.जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आविष्कार कल्चरल ग्रुप गेल्या २१ वर्षापासून यशस्वी वाटचाल करीत असून आविष्कारने राज्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आविष्कारने आ.जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १९ व २० फेब्रुवारी २०२३ रोजी २१ व्या संगीत महोत्सवाचे आयोजन केले होते. यामध्ये खुदा गवाह,हम, तेजाब, अजूबा, कभी खुशी-कभी गम, करण-अर्जुन या लोकप्रिय चित्रपटांचे पार्श्व गायक सुदेश भोसले यांच्या ‘लाइव्ह इन कॉन्सर्ट’व गोलमाल रिटर्न,रांजना,प्रेम रतन धन पायो या लोकप्रिय हिंदी चित्रपटांची युवा गायिका अन्वेषा दत्ता- गुप्ता यांचा ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’या दोन कार्यक्रमांचे आयोजन केले होते. आविष्कारने गेल्या २१ वर्षात श्रेया घोषाल,शंकर महादेवन,दीत नारायण,जावेद अली,कुमार सानू,महेश काळे,पंडीत जसराज, अभिजित भट्टाचार्य,सुरेश वाडकर,बेला शेंडे आदी ९५ पेक्षा जास्त कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करून कला रसिकांचे मनोरंजन केलेले आहे.
आविष्कारचे मार्गदर्शक मोहन चव्हाण, कार्याध्यक्ष प्रा.प्रदीप पाटील,उपाध्यक्ष भूषण शहा,सहसचिव विजय लाड,माजी सचिव प्रा.कृष्णा मंडले,खजिनदार राजेंद्र माळी, माजी अध्यक्ष सतिश पाटील,माजी कार्याध्यक्ष नजीर शेख,डॉ.अतुल मोरे,लव्हाजी देसाई, धनंजय भोसले, अजय थोरात,विश्वास कदम,संतोष पाटील, हर्षवर्धन घोरपडे,श्रेयस पाटील,सौरभ सावंत,अनिल पाटील, विश्वजित पाटील,अक्षय जाधव,बी.आर. पाटील,संजय पाटील,प्रताप कवठेकर यांच्या सह आविष्कारचे सदस्य हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.














































































