सांगली । गतवर्षी तुटलेल्या उसाला ४०० रुपये हप्ता मिळावा,या हंगामातील उसाला पहिली उचल ३५०० रुपये मिळावी या मागणीसाठी रविवारी वाळवा तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चक्काजाम आंदोलन केले.इस्लामपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाक्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चक्का जाम आंदोलन केले.यामुळे सुमारे सहा किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.मागण्या मान्य झाल्या नाहीत तर संघटनेने आणखी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
उसाला पाहिला हप्ता ३५०० रूपये व तुटलेल्या उसाला ४०० रूपये द्या या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यात पासून चालू असलेल्या ऊस आंदोलन रविवारी इस्लामपूर येथे चक्काजाम आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंबेडकर नाक्यावर करण्यात आले.गेल्या दोन महिन्यापासून राज्य शासन दखल घेत नव्हते, याचा निषेध केला म्हणून आज राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते.
इस्लामपूर येथे चक्काजाम आंदोलनात प्रकाश हॉस्पिटलपर्यंत वाहनांच्या रांगा गेल्या होत्या.तर पेठनाक्यापर्यत रांगा गेल्या होत्या.यावेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भागवत जाधव म्हणाले की,आज चक्काजाम आंदोलन केले आहे.जर ऊस आंदोलनाचा तोडगा नाही निघाला तर उद्यापासून आंदोलनाची तीव्रता अधिक प्रमाणात वाढवू.होणाऱ्या नुकसानीस कारखाना जबाबदार राहणार आहे.ऊस दराचा संघर्ष अटळ आहे हे कारखान्यांनी लक्षात घ्यावे.
हेही वाचा – ऊस आंदोलन पेटलं; वेगवेगळ्या मार्गांवर चक्काजाम आंदोलन
यावेळी भागवत जाधव जगन्नाथ भोसले,आप्पासाहेब पाटील,एस् यु सन्दे,प्रकाश देसाई,शिवाजी पाटील,शंकर पाटील,प्रदीप पाटील,प्रभाकर पाटील, काशिनाथ निंबाळकर,संतोष शेळके,रविकिरण माने,प्रकाश माळी,प्रविण पाटील,सर्जेराव पाटील,एकनाथ निकम,प्रकाश माळी,प्रविण पाटील,शिवाजी मोरे,साहेबराव पाटील, उत्तम पाटील,यशवंत पाटील,रामचंद्र जाधव,आनंदराव पाटील,सुभाष पवार,बाबासाहेब पाटील,अशितोष जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
ताकारी । उसाला पाहिला हप्ता ३५०० रूपये व तुटलेल्या उसाला ४०० रूपये द्या या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यात पासून चालू असलेल्या ऊस आंदोलन आज ताकारी कॅनालवर येथे कराड-तासगाव रस्त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केले.गेल्या दोन महिन्यापासून राज्य शासन दखल घेत नव्हते,याचा निषेध केला म्हणून आज राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते.ताकारी कॅनालवर पुलावर येथे चक्काजाम आंदोलनात वाहनांच्या रांगा घोगाव गावापर्यंत तर रेठरे हरणाक्ष फाट्यावर पर्यंत रांगा गेल्या होत्या.
हेही वाचा – कारखानदारांची हुकूमशाही मोडून काढा…शंकरअण्णा पुन्हा कडाडले…पहा व्हिडीओ
यावेळी भागवत जाधव शहाजी पाटील,सागर पाटील,युवराज निकम,जगन्नाथ भोसले,यशवंत पाटील आप्पासाहेब पाटील,एस् यु सन्दे,प्रकाश देसाई,शिवाजी पाटील,शंकर पाटील,प्रदीप पाटील,प्रभाकर पाटील,काशिनाथ निंबाळकर,संतोष शेळके,सतिश सावंत,पद्माकर पाटील,शशिकांत पाटील,सर्जेराव पाटील,आप्पा पेठकर,रविकिरण माने,प्रकाश माळी,प्रविण पाटील,एकनाथ निकम,प्रकाश माळी,प्रविण पाटील,शिवाजी मोरे,साहेबराव पाटील,उत्तम पाटील,रामचंद्र जाधव, आनंदराव पाटील,सुभाष पवार,बाबासाहेब पाटील,अशितोष जाधव आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.