Last Updated on 19 Nov 2023 4:05 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली/कोल्हापूर । माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ऊसदर प्रश्नी सांगली जिल्ह्यासह राज्यातील संपूर्ण ऊस पट्ट्यामध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे.वेगवेगळ्या मार्गावर चक्काजाम आंदोलन सुरु आहे.या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन ठीकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.विविध भागात आज शेतकरी रस्त्यावर उतरलेले आहेत.बहुतेक ठिकाणी सकाळीच चक्काजाम आंदोलनाला सुरुवात झाली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथे चक्काजाम आंदोलनात सहभागी झाले होते.
यावेळी मागील हंगामातील उसाला दुसरा हप्ता 400 रुपये मिळालाच पाहिजे, चालू उसाला 3500 रुपये पहिली उचल मिळालीच पाहिजे, एकच गट्टी राजू शेट्टी, कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही अशा घोषणा देण्यात आल्या.
ऊस उत्पादकांना मागील हंगामातील 400 रुपये आणि चालू हंगामात 3500 रुपये दर कारखान्यांनी जाहीर करावा अशी मागणी केली आहे. गेल्या महिन्याभरापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलनाच्या माध्यमातून केली जात आहेत.गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागात ऊस आंदोलन सुरु आहे. कोल्हापुरातच नाही तर सांगलीतही ऊस प्रश्न पेटला आहे.जो पर्यंत ऊस दराचा तोडगा निघत नाही,तोपर्यंत सांगली दत्त इंडिया कारखाना बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.दिवाळी आधी सुरु झालेल्या आंदोलनावर आता दिवाळी संपली तरी तोडगा निघाला नाही.
13 सप्टेंबर पासून ऊस दरासाठी आंदोलन सुरू आहे. दि. 17 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर पर्यंत आक्रोश पदयात्रा काढण्यात आली. 7 नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर येथे 22 वी ऊस परिषद झाली. तसेच 7 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबरपर्यंत जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडागंणावर ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे.
सांगली जिल्हा
यंदाची पहिली उचल 3500 रूपये जाहीर करावी, गत वर्षीचे 400 रुपये दुसरा हप्ता तातडीने द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रविवारी 10 वाजता सांगली नांदे मुख्य रस्त्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते.स्वाभिमानीचे नवीनकुमार पाटील चिंचवाडे, सतीश हेरले, यांच्या नेतृत्वाखाली नाद्रेतील सर्वपक्षीय,शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभाग घेत चक्काजाम आंदोलन केले.
वाळवा तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ताकारी कॅनाल येथे चक्का जाम आंदोलन सुरु आहे.
ताकारी । उसाला पाहिला हप्ता ३५०० रूपये व तुटलेल्या उसाला ४०० रूपये द्या या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यात पासून चालू असलेल्या ऊस आंदोलन आज ताकारी कॅनालवर येथे कराड तासगाव रोडवर येथे चक्काजाम आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्तेनी केले गेल्या दोन महिन्यापासून राज्य शासन दखल घेत नव्हते, याचा निषेध केला म्हणून आज राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते. ताकारी कॅनालवर पुलावर येथे चक्काजाम आंदोलनात वाहनांच्या रांगा घोगाव गावापर्यंत तर रेठरे हरणाक्ष फाट्यावर पर्यंत रागा गेल्या होत्या होत्या, यावेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भागवत जाधव म्हणाले की आज चक्काजाम आंदोलन केले आहे ,जर ऊस आंदोलनाचा तोडगा नाही निघाला तर उद्यापासून आंदोलनाची तीव्रता अधिक प्रमाणात सारखेचा भाव ३७०० पुढे आहे, साखर कारखान्यानी आडमुठ्या भुमिका सोडावी अन्यथा होणार्या नुकसानीस कारखाना जबाबदार राहणार आहे ऊस दराचा संघर्ष अटळ आहे हे कारखान्यानी लक्षात घ्यावे,यावेळी भागवत जाधव शहाजी पाटील,सागर पाटील, युवराज निकम,जगन्नाथ भोसले, यशवंत पाटील आप्पासाहेब पाटील, एस् यु सन्दे, प्रकाश देसाई,शिवाजी पाटील, शंकर पाटील,प्रदीप पाटील, प्रभाकर पाटील, काशिनाथ निंबाळकर, संतोष शेळके, सतिश सावंत, पद्माकर पाटील, शशिकात पाटील,आप्पा पेठकर,रविकिरण मानेप्रकाश माळी, प्रविण पाटील, एकनाथ निकम, प्रकाश माळी, प्रविण पाटील, शिवाजी मोरे,साहेबराव पाटील, उत्तम पाटील, रामचंद्र जाधव, आनंदराव पाटील, सुभाष पवार, बाबासाहेब पाटील, अशितोष जाधव आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
.
इस्लामपूर । उसाला पाहिला हप्ता ३५०० रूपये व तुटलेल्या उसाला ४०० रूपये द्या या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यात पासून चालू असलेल्या ऊस आंदोलन आज इस्लामपूर येथे चक्काजाम आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्तेनी आंबेडकर नाक्यावर करण्यात आले. गेल्या दोन महिन्यापासून राज्य शासन दखल घेत नव्हते, याचा निषेध केला म्हणून आज राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते. इस्लामपूर येथे चक्काजाम आंदोलनात रागा प्रकाश हॉस्पिटल पर्यंत रागा गेल्या होत्या तर पेठ नाक्यापर्यत रागा गेल्या होत्या, यावेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भागवत जाधव म्हणाले की आज चक्काजाम आंदोलन केले आहे ,जर ऊस आंदोलनाचा तोडगा नाही निघाला तर उद्यापासून आंदोलनाची तीव्रता अधिक प्रमाणात वाढवू होणाऱ्या नुकसानीस कारखाना जबाबदार राहणार आहे ऊस दराचा संघर्ष अटळ आहे हे कारखान्यांनी लक्षात घ्यावे,यावेळी भागवत जाधव जगन्नाथ भोसले,आप्पासाहेब पाटील,एस् यु सन्दे, प्रकाश देसाई,शिवाजी पाटील, शंकर पाटील,प्रदीप पाटील, प्रभाकर पाटील, काशिनाथ निंबाळकर, संतोष शेळके, रविकिरण मानेप्रकाश माळी, प्रविण पाटील,एकनाथ निकम, प्रकाश माळी,प्रविण पाटील,शिवाजी मोरे,साहेबराव पाटील, उत्तम पाटील,यशवंत पाटील, रामचंद्र जाधव, आनंदराव पाटील,सुभाष पवार,बाबासाहेब पाटील,अशितोष जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
नांद्रे चक्काजाम

कोल्हापूर जिल्हा
)
ऊस दरवाढीच्या मुद्यावरून गेल्या अनेक दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन सुरू आहे. मात्र अजूनही मागणीला यश येत नसल्यानं आता कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आज जिल्ह्यात चक्काजाम आंदोलनाला सुरुवात झाली आहे. चक्काजाम आंदोलनामुळे अनेक भागात वाहतूक विस्कळीत झाल्याचं चित्र आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटना (ता.करवीर) वळिवडे,वसगडेचिंचवाड,मुडशिंगी,सांगवडे भागातील सर्व शेतकरी बांधव एकत्र येऊन तावडे हॅाटेलच्या चौकात चक्का जाम आंदोलन केले.

बिद्री कारखाना व मुधाळतिट्टा चक्काजाम आंदोलन

सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यात ऊस दरासाठी शेतकऱ्यांच्या आंदोलनाने आता उग्र स्वरूप धारण केले असून सहकारी आणि खाजगी साखर कारखानदारांची मुजोरी रोखण्यासाठी बळीराजा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.
शनिवारी रात्री आणि रविवारी सकाळी सातारा आणि सांगली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात संघटनेने गतवर्षी तुटून गेलेल्या ऊसाला प्रति टन 400 रुपये मिळावेत व चालू हंगामातील तुटून जाणाऱ्या उसाला एक रकमी 3500 रुपये मिळावेत,या मागणीसाठी आंदोलन करत सुमारे 60 ते 70 ऊस वाहतुकीच्या वाहनांच्या चाकातील हवा सोडून दिली. बळीराजा आणि स्वाभिमानी संघटनेच्या चक्काजाम आंदोलनाने दोन्ही जिल्ह्यातील साखर कारखानदारांचे धाबे अक्षरशः दणाणले आहेत. जोपर्यंत ऊस दर मिळत नाही, तोपर्यंत उसाची वाहतूक करू नका, अन्यथा वाहनाच्या चाकातील हवा सोडली जाईल, असा कडक इशारा या संघटनांकडून ऊस वाहतूकदारांना देण्यात आला आहे.
कराड कासेगाव परिसर, पाटण कराड रस्ता, मलकापूर, तासवडे टोल नाका, मल्हारपेठ, निसरे फाटा, तांबवे फाटा, पाटण रस्ता- वारूजी फाटा परिसरात आंदोलनाने व्यापक स्वरूप घेतले असून रविवारी रात्री देखील मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्याचा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेने दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी सकाळी अनेक ठिकाणी चक्काजाम आंदोलन सुरू केल्याने पोलीस प्रशासनाची धावपळ उडाली आहे. सातान्यातील बॉम्ब रेस्टॉरंट चौकातही हे आंदोलन करण्यात आल्याने पोलिसाची भंबेरी उडाली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले, त्यानुषंगाने अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून साखर कारखाना प्रशासन ऊस दराबाबत काय भूमिका घेणार, याकडे बळीराजा आणि स्वाभिमानी संघटता तसेच शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
या चक्का जाम आंदोलनाचा फटका खरतर मुंबई बंगलोरअशियाई महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना बसला.वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे वाहतूक मुंगीच्या पावलांनी पुढे सरकत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
सातारा कोरेगाव रस्त्यावर चक्काजाम

सातारा । स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन सुरू आहे.दरम्यान सातारा जिल्ह्यात देखील या आंदोलनाचे पडसाद पाहायला मिळत आहेत सातारा कोरेगाव रस्त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटना सातारा जिल्हा यांच्यावतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले.















































































