Last Updated on 13 Nov 2023 6:46 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । गत वर्षी तुटलेल्या ऊसाला ४०० रुपये दुसरा हप्ता मिळावा.चालु ऊसाला ३५०० रूपये यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज आक्रमक पवित्रा घेत वाळवा तालुक्यात ठीकठिकाणी ऊस वाहतूक रोखून धरली.काही वाहनांच्या टायरमधील हवा सोडली. तर काही ठिकाणी ऊस तोंडी बंद पाडल्या.त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेती अधिकाऱ्यांमध्ये वादावादीचे प्रसंग घडले.संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हुतात्मा, सर्वोदय, राजारामबापू, वसंतदादा व कृष्णा कारखान्याच्या ऊस वाहतूकदारांना टार्गेट करत ठीकठिकाणी वाहतूक रोखली अन् टायरमधील हवाही सोडली.
स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळपासूनच आंदोलनाला सुरवात केली. सर्वोदय सहकारी साखर (राजारामबापू युनिट क्र.३)सहकारी साखर व वसंतदादा पाटील साखर कारखाना(दत्त शुगर) सांगली कारखान्याकडे जाणारे ऊस वाहतूक रोखून धरत ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर मधील मिरजवाडी गावाजवळ ५ ट्रॅक्टरची हवा सोडण्यात आली.स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आष्टा,मर्दवाडी,बावची, पोखर्णी,नागाव,बागणी,काकाचीवाडी,रोझावाडी,या परिसरात फिरून ऊसतोडणी बंद पाडण्यात आली.परंतु आज जैसे थे परिस्थिती राहिल्याने आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन पेठ सांगली रोडवर मिरजवाडी येथील ५ ट्रॅक्टरमधील व मिरजवाडी हवा सोडण्यात आली.त्यामुळे रस्त्यावर वाहतूक व्यवस्था कोलमडून गेली.यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व कारखान्यादाराचे शेती अधिकारी यांच्यात वादावादी झाली.

बावची फाट्यावर काही ट्रॅक्टर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रोखुन धरले.जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत ऊस ट्रॅक्टर सोडणार नाही अशी भूमिका घेतली.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष भागवत जाधव,भाजप युवा मोर्चाचे प्रविण पाटील,बाबासाहेब सांद्रे,जगन्नाथ भोसले,पंडित सपकाळ,प्रताप पाटील,विश्वजीत पाटील,राजेंद्र राणे,विक्रांत गुरव,अषईश काळे,पोपट सुतार,सुरेंद्र माळी,मयुर पाटील,सुभाष पाटील,अमोल कोल्हे,शितल खंजीरे,सुनील कुदळे,संदेश उगआळए,बबलू जमादार,प्रभाकर पाटील,शिवाजी पाटील,उत्तम पाटील,प्रकाश माळी,संपत भोसले,अधिक यादव,शामराव जाधव, सचिन यादव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

बोरगाव वीटभट्टी परिसरात राजारामबापू सहकारी साखर कारखान्याकडे जाणारे ऊस वाहतूक रोखून धरत ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर-बैलगाडी रोखले.तर त्यातील काही बैलगाडी-ट्रॅक्टरची हवा सोडली.तर यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे बहे पुल येथे येथे ऊसाने भरलेल्या बैलगाड्यांच्या चाकातील हवा सोडली,बहे हायस्कूलजवळ दोन ट्रॅक्टरची हवा सोडण्यात आली.स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी बहे तांबवे,नरसिंहपूर,खरातवाडी,हुबालवाडी, बोरगाव,फार्णवाडी परिसरात फिरून ऊसतोडी बंद पाडल्या.यावेळी भागवत जाधव,जगन्नाथ भोसले,संतोष शेळके,शहाजी पाटीलपंडित सपकाळ,प्रदीप पाटील, प्रताप पाटील,प्रभाकर पाटील,प्रकाश माळी,शामराव जाधव,सचिन यादव,दिनकर पवार सह कार्यकर्ते उपस्थित होते.










































































