Last Updated on 13 Nov 2023 1:15 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । बहे ता.वाळवा येथील बहे सर्व सेवा सोसायटीचा लाभांश वाटपाचा कार्यक्रम वाळवा तालुका शिक्षण संस्थेचे सहसचिव अॅड. धैर्यशील पाटील यांच्या हस्ते पार पडला.दीपावली निमित्ताने संस्थेच्या सभासदांना 10 टक्के लाभांश देण्यात आला.यावर्षीपासून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक बहे शाखेत सभासदांच्या सेव्हींग खात्यावर लाभांश जमा केला असल्याची माहिती चेअरमन यशवंत पाटील यांनी दिली.
या कार्यक्रमास वाळवा तालुका शिक्षण संस्थाचे सहसचिव अॅड. धैर्यशील पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.संस्थेचा कारभार अतिशय उत्तम,स्वच्छ व पारदर्शक चालत असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.तसेच बहे, हुबालवाडी,खरातवाडी गावातील 1 हजार 874 सभासदांसाठी 21 लाख 49 हजार 371 रुपये लाभांश वाटप धनादेशाद्वारे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी किशोर पाटील यांच्याकडे त्यांनी सुपूर्द केला. स्वागत व प्रास्ताविक माजी अध्यक्ष जयदीप पाटील यांनी केले. उपाध्यक्ष रामचंद्र पाटील यांनी आभार मानले.
यावेळी राजारामबापू कारखान्याचे संचालक विठ्ठलराव पाटील,कृष्णा कारखान्याचे संचालक अविनाश खरात,कृष्णा बँकेचे संचालक शिवाजी पाटील,राजारामबापू बँकेचे माजी संचालक बाबूराव हुबाले,माजी अध्यक्ष सिताराम हुबाले,प्रा.शशिकांत पाटील,भानुदास खरात,विलासराव पाटील,हणमंतराव पाटील,अॅड. कृष्णराव पाटील,वसंतराव पाटील,धोंडीराम पवार,माजी अध्यक्ष जयदीप पाटील,उपाध्यक्ष रामचंद्र पाटील,अधिक दमामे,शहाजी पाटील,विकास नांगरे,रणजित पवार,डांगबाबा शिंदे,गणेश शिंदे, सुनेत्रा थोरात,सचिव सुधाकर मोहिते तसेच सर्व माजी अध्यक्ष,संचालक,विविध संस्थेचे पदाधिकारी,सभासद आदी उपस्थित होते.










































































