Last Updated on 12 Nov 2023 5:58 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । गत वर्षी तुटलेल्या उसाला ४०० रुपये दुसरा हप्ता मिळावा,चालु ऊसाला ३५०० रूपये यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज आंदोलनाची धग कायम होती,आज सर्वोदय सहकारी साखर (राजारामबापू युनिट क्र.३) सहकारी साखर कारखान्याकडे जाणारे ऊस वाहतूक रोखून धरत ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर,बैलगाडी रोखले.तर त्यातील २० ते २५ बैलगाडी व ५ ट्रॅक्टरची हवा सोडली.
स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आष्टा,मर्दवाडी,बावची,पोखर्णी,नागाव,बागणी,काकाचीवाडी,रोझावाडी,या परिसरात फिरून ऊसतोडणी बंद पाडण्यात आली परंतु आज जैसे थे परिस्थिती राहिल्याने आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन पेठ सांगली रोडवर आष्टा येथील थोटे डेअरी समोर,२ ट्रॅक्टर व मिरजवाडी कारदंवाडी गावाजवळ सर्वोदय सहकारी साखर कारखान्याकडे २० ते २५ बैलगाडीच्या हवा सोडण्यात आली,
जाणारे तर हुतात्मा सहकारी साखर कारखान्याचे काल रात्री कृष्णा नदीच्या पुलावर नवेखेड- पुणदी पुलाजवळ ट्रॅक्टर चारही चाकातील हवा सोडण्यात आली.त्यामुळे रस्त्यावर वाहतूक व्यवस्था कोलमडून गेली यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व कारखान्यादाराचे शेती अधिकारी याच्यात मोठा वाद झाला उद्यापासून ऊसतोडणी बंद करतो असे आश्वासन देण्यात आले .
यावेळी भागवत जाधव, जगन्नाथ भोसले, पंडित सपकाळ , प्रदीप पाटील, प्रताप पाटील, प्रविण पाटील,संपत भोसले,अधिक यादव,शामराव जाधव , सचिन यादव, दिनकर पवार सह कार्यकर्ते उपस्थित होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
शेतकरी भावांनो, ऊसतोडी घेऊ नका…
यावर्षी सांगली जिल्ह्यात तासगाव,नागेवाडी,मानगंगा,डफळापुर,हे चार साखर कारखान्याने नव्यावे चालु होणार आहेत.यंदा कमी पर्जन्यमान असल्याने साखर कारखाने ८० ते ८५ दिवस चालणार आहेत.साखर कारखान्याकडे ऊस उपलब्ध नाही.दहा वर्षांमध्ये यंदा उसाचे उत्पन्न कमी आहे.त्यामुळे कारखानदारांना अद्दल घडवण्याची हीच वेळ आहे.शेतकऱ्यांनी ही संधी सोडू नये..तरी शेतकऱ्यांनी ऊसतोड घेऊ नये. त्यामुळे शेतकऱ्यांना यावर्षी चांगला भाव मिळेल.
भागवत जाधव
स्वाभिमानी शेतकरी संघटना









































































