Last Updated on 09 Nov 2023 5:35 PM by Sanjay Patil/Adhorekhit
‘राजारामबापू’ व ‘हुतात्मा’ च्या अध्यक्षांच्या घरासमोर उद्या खर्डा भाकरी खाणार
सांगली । तुटलेल्या उसाला प्रतिटन ४०० मिळावे व जाणाऱ्या उसाला पहिला हप्ता ३५०० रूपये जाहीर करावा,यासाठी गेल ऊस आंदोलन सुरू आहे.शेतकऱ्यांना दिवाळीपुर्वी ४०० रुपये प्रतिटन खात्यावर पैसे जमा करावेत अशी मागणी करण्यात आली होती.पण जिल्ह्यातील साखर कारखान्यांन्यानी अजूनही शेतकऱ्यांना पैसे देण्यास असमर्थता दाखवली आहे.म्हणून दिवाळीच्या पहिल्या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील व हुतात्मा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांच्या घरासमोर खर्डा भाकरीचे गांधीगिरी व आहिंसाच्या मार्गाने आंदोलन करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भागवत जाधव यांनी दिली,
जाधव पुढे म्हणाले की, १३ सप्टेंबर कोल्हापुरात येथील उपप्रादेशिक साखर कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. २ आक्टोबर ढोल बजाव आंदोलन करण्यात आले होते.मा.खा.राजु शेट्टी यांनी२२ दिवसांची ५२२ किलोमीटरची आक्रोश पदयात्रा काढण्यात आली.साखरेला यावर्षी सरासरी भाव ३६४०च्या वर गेला असताना उपपदार्थ सुद्धा चांगला भाव मिळत असताना साखर कारखान्यांना शेतकऱ्यांची दया येत नाही. धनत्रयोदशीच्या म्हणजे शेतकर्याचे धनधान्य रासिचे पउजन पण कारखान्यांच्या धोरणामुळे शेतकर्याना दिवाळी करणं सुध्दा अवघड झाले आहे.यांचे प्रायश्चित्त म्हणून आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुक्यातील कार्यकर्ते साखर कारखान्याच्या अध्यक्षाच्या घरासमोर गांधीगिरी मार्गाने खर्डा भाकरी खाऊन आंदोलन करणार आहे
या आंदोलनास जगन्नाथ भोसले,अँड.एस्.यु .सन्दे,प्रकाश देसाई,आप्पासाहेब पाटील,गुंडाभाऊ आवटी,दिलीप पाटील,प्रभाकर पाटील,प्रदीप पाटील, पंडित संपकाळ, प्रताप पाटील,प्रकाश माळी,शिवाजी पाटील,अनिल करळे,भैरवनाथ कदम,खासेराव निंबाळकर,धैर्यशील पाटील,रविकिरण माने,संतोष शेळके, शहाजी पाटील,प्रविण पाटील,मधुकर डिसले,तानाजी साठे,एकनाथ निकम,प्रकाश माळी,राजाराम परिट,शिवाजी मोरे,भुषण वाकळे,अभिजित नवले,आकाश साळुंखे,निखिल मगदूम,प्रतिम नवले आदीकार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.












































































