तर उपाध्यक्षपदी दिग्विजय दिनकर पाटील यांची निवड
सांगली । खासदार एस. डी. पाटील सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी प्रा.डॉ. अशोक रामचंद्र शिंदे यांची तर उपाध्यक्षपदी प्रा.दिग्विजय दिनकर पाटील यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली,
निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी एस. डी. माने यांचे अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी अप्पर लेखापरीक्षक राजेंद्र पाटील उपस्थित होते.
संचालक मंडळात प्राचार्य डॉ अशोक पाटील,प्रा हर्षल पाटील,प्रा.विजयकुमार शिंदे,संतोष लोहार,शिवराज पाटील,दिलीप खांबे,विश्वास वाघमारे,प्रा सुनीता पाटील व प्रा वर्षा पाटील यांची बिनविरोध निवड झाली.
निवडणूक प्रक्रियेनंतर नवनियुक्त संचालक मंडळाने संस्थेचे संस्थापक स्व.खासदार एस.डी.पाटील साहेब यांच्या पुतळ्यास व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
वाळवा तालुका शिक्षण संस्थेचे मानद सचिव ॲड. बी एस पाटील,सहसचिव ॲड.धैर्यशील पाटील,राष्ट्रीय हॉकी खेळाडू श्री संजय पाटील व संस्थेतील सर्वांनी नूतन संचालक मंडळाचे अभिनंदन केले.
यावेळी पतसंस्थेचे सचिव श्री सुभाष नांगरे,सतिश दळवी,रेखा मदने व श्री अतुल पाटील उपस्थित होते.
वाळवा तालुका शिक्षण संस्थेच्या प्राथमिक,माध्यमिक,ज्युनिअर कॉलेज,सीनियर कॉलेज,डी फार्मसी, बी फार्मसी, डीएड, बीएड, कॉलेज अशा स्तरावर सांगली, रत्नागिरी, पुणे अशा जिल्ह्यांमध्ये विविध शाखा आहेत. या शाखांमधील सेवक वर्ग या पतसंस्थेचा सभासद आहे.या वाळवा तालुका शिक्षण संस्थेची संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ तसेच या पतसंस्थेच्या माध्यमातून उत्तम प्रशासन व कार्यक्षम सेवा देण्याचा प्रयत्न मानद सचिव ॲड. बी. एस. पाटील तसेच ॲड. धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
नूतन अध्यक्ष प्रा. डॉ. अशोक शिंदे यांच्याविषयी…
नूतन अध्यक्ष प्रा. डॉ. अशोक शिंदे हे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय इस्लामपूर येथे वाणिज्य विभाग प्रमुख आहेत. त्यांना नुकतीच प्रोफेसर पदी बढती मिळाली आहे. ते शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे अकाउंटन्सी अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून गेली दहा वर्षे काम पाहत आहेत.तसेच फॅकल्टी मेंबर म्हणून देखील विद्यापीठाकडे ते काम करत आहेत. इस्लामपूर येथील सामाजिक व सेवाभावी अनेक उपक्रम राबवत असलेल्या माणुसकीचं नातं प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष म्हणून काम पाहतात.