Last Updated on 08 Nov 2023 12:47 PM by Sanjay Patil/Adhorekhit
काही भागात ढगांचा गडगडाट,विजांच्या कडकडाटासह पावसाने झोडपले
सांगली । जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पहाटेपासून हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरु आहे.काही भागात ढगांचा गडगडाट,विजांच्या कडकडाटासह पावसाने झोडपून काढले आहे.अनेक ठिकाणी ढग काळवंडून आले आहेत तर बऱ्याच भागात सूर्यदर्शन झालेले नाही.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस ढगांचा गडगडाट, सांगलीत शिडकावा तर कडेगाव, वाळवा, पलूस, शिराळा, कवठेमहांकाळ, आटपाडी, जत तालुक्यात पाऊस पहाटेपासूनच पाऊस बरसत आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात पहाटे पासून हलक्या स्वरूपाच्या पावसाची हजेरी असून पलूस तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे.कडेगाव तालुक्यात पहाटेपासून संततधार पाऊस सुरु आहे.(‘अधोरेखित’ च्या Facebook ला लाईक किंवा फॉलो करा)

वाळवा तालुक्याला सकाळी-सकाळीच पावसाने झोडपले तर विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडत आहे.दुपारी बाराच्या सुमारास तालुक्यातील काही भागाला जोरदार पावसाने झोडपून काढले. दरम्यान,आणखी दोन दिवस ढगाळ वातावरण व हलका पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
दरम्यान,भात काढणी सुरु असून पीक उत्पादक शेतकऱ्यांची दाणादाण उडाली आहे.त्यामुळे सालबेजमीच्या असणाऱ्या धान्यावर या अवकाळी पावसामुळे अरिष्ठ कोसळले आहे.ऊसतोडीही खोळंबल्या आहेत.









































































