बुलढाणा । सोयाबीन-कापूस प्रश्नी 1 नोव्हेंबर पासून होणारी ‘एल्गार रथयात्रा’ मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा म्हणून तूर्त स्थगित केली होती.आता या ‘एल्गार रथयात्रे’ ला 5 नोव्हेंबर पासून शेगाव येथून सुरवात होणार आहे.
‘एल्गार रथयात्रे’ चा 5 नोव्हेंबर पासून यात्रेचा जो नियोजित मार्ग होता.त्या मार्गाने ही यात्रा पुढे जाणार आहे. तसेच दि.1 ते 4 नोव्हेंबर दरम्यानची जी गावे यात्रेतून सुटणार आहेत,ती गावे पुढील आठवड्यात यात्रेदरम्यान कव्हर करण्यात येणार आहेत
‘एल्गार रथयात्रे’ची सुरुवात 5 नोव्हेंबर 2023 सकाळी 10 वाजता शेगाव येथील श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरातून होणार आहे.शेतकरी-शेतमजूर-तरुणांनी आपल्या हक्कासाठी मोठया संख्येने सामील व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.