सांगली । इस्लामपूर येथील मुक्तांगण प्ले स्कूलमध्ये दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुलांना किल्ला बांधणीचा प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला.एवढ्या लहान वयात मुलांना शिवाजी महाराज निश्चितच माहित असतात. त्यांना त्यांच्या शौर्यकथा सांगत किल्ला ही संकल्पना समजून दिली गेली.
इस्लामपूर येथील प्रशासकीय इमारतीच्या परिसरात मुक्तांगण मध्ये खेळातून आणि अनुभवातून शिक्षण दिले जाते.
किल्ला म्हणजे काय ? हे शिक्षण म्हणून जाणून घेण्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभव घेतला तर मुलांच्या निरीक्षण क्षमता,नवनिर्माण क्षमता वाढवण्यासाठी मदत होते.मुक्तांगण मध्ये मातीचा चिखल बनवणे व खेळणे,दगड विटाची रचना करताना मुलं रममाण झाली.कल्पनाशक्ती चालना देण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरला.
‘मुक्तांगण’मध्ये शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली किल्ला बांधला गेला.शाळेच्या आवारात किल्ल्याची रचना केली आहे.दगड,माती,विटा,सिमेंट,रंग याचा वापर केला आहे.शिवकालीन किल्याची काल्पनिक प्रतिकृती साकारली आहे. गड किल्यावरील पाणी,विहीर,तलाव,वेगवेगळी मंदिरे,तटबंदी,खंदक उभारली आहेत.बुरुज,चोरवाटा,वेगवेगळ्या दऱ्या,गुहा बनवल्या आहेत.किल्ल्यावर सैनिक मांडताना ती कोणती व्यक्तीरेखा आहे.त्यांचा इतिहास गोष्ट स्वरूपात सांगण्यात आला.लहान मुले हे जाणून घेण्यासाठी उत्सुक दिसली.शिवाजी महाराजांच्या बद्द्ल मुलांना प्रचंड आकर्षक असते ते घोषणाबाजी वरून लक्षात येते.
दिवाळीच्या सुट्टीत किल्ला बांधला जातो हे मुलांच्या मनावर बिंबवण्यात आले.संचालिका सौ.वर्षाराणी मोहिते यांनी संयोजन केले.
दिवाळी सुटीचा योग्य वापर करत पालकांनी वेगवेगळ्या किल्ल्याच्या हुबेहूब प्रतिकृती उभारण्यासाठी मुलांना मदत करायला हवी.किल्ला बांधणीच्या निमित्ताने मुलांना ऐतिहासिक वारसा जाणून देता येतो.दिवाळी साजरी करताना मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पालकांनी सुट्टी सदुपयोग करण्यासाठी आग्रही भूमिका बजावावी.
संचालिका सौ.वर्षाराणी मोहिते