Last Updated on 03 Nov 2023 12:24 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । देशाची वाटचाल आर्थिक सक्षमीकरणापासून महासत्ताकडे चालली असली तरी,खऱ्या अर्थाने आपल्या देशातील नागरिक आरोग्यदृष्टया निरोगी व सक्षम असला पाहिजे.आरोग्य क्षेत्रातील बदल व नवनवीन तंत्रज्ञान निमशहारासह ग्रामिण भागात पोहोचले पाहिजे.केंद्र व राज्य शासनाने आपल्या देशातील नागरिकावर पैशाअभावी उपचार थांबू नयेत यासाठी विविध योजना शासनस्तरावर राबवल्या आहेत.याचा लाभ हजारो गरजू रुग्ण घेत आहेत.आरोग्यसेवा ही सर्वसामान्यांना आर्थिकदृष्ट्या न परवडणारी असली तरी,प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथील योजना व उपचार पद्धत खऱ्या अर्थाने देश सेवेच्या भावनेतून सुरु आहे.याचे मला विशेष समाधान वाटते असे मत सांगली जिल्ह्याचे शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी व्यक्त केले.
इस्लामपूर येथील प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे नव्याने सुरु करण्यात आलेल्या एम.आर.आय. सेवा सुविधेचा शुभारंभ सांगली जिल्ह्याचे शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.यावेळी प्रकाश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संजय जाधव,सचिव नितीन भोसले- पाटील,मेडिकल डायरेक्टर डॉ. विजय पाटील,वैद्यकीय अधीक्षक डॉ. भूपाल गिरीगोसावी आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना सांगली जिल्ह्याचे शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम पुढे म्हणाले , आरोग्य सेवेच्या क्षेत्रामध्ये सामाजिक बांधिलकी व देश सेवेच्या भावनेतून काम करणाऱ्या फार कमी संस्था आहेत. यामध्ये प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे नाव गरजू रुग्ण व नातेवाईकांच्या कडून नेहमीच ऐकायला मिळत आहे. या ठिकाणी शासनाच्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना दिला जातो. तर जे रुग्ण शासकीय योजनांच्या निकषानुसार पात्र ठरत नाहीत त्या रुग्णासाठी या हॉस्पिटल व्यवस्थापनाने प्रकाश आरोग्य योजना सुरु केली आहे.गरजू रुग्ण आरोग्यसेवेविना,उपचाराविना राहू नये हि पवित्र भावना हॉस्पिटल व्यवस्थापनाची दिसुन येते. हे आरोग्य सेवा देणारे हॉस्पिटल वाळवा तालुका व सांगली जिल्ह्यासाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरत आहे.
प्रकाश हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भूपाल गिरीगोसावी म्हणाले,प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे सर्वसामान्य गरजू रुग्णावर विविध योजनांच्या माध्यमातून उपचार करून त्यांच्या वेदनेवर फुंकर घालण्याचे काम खऱ्या अर्थाने या ठिकाणी केले जाते.सांगली जिल्ह्यासह सातारा,कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्ण याठिकाणी औषोधोपचारासाठी येत आहेत.येथील औषोधोपचार पद्धत,सेवा सुविधाचा लाभ व अनुभव घेणारा प्रत्येक रुग्ण व नातेवाईक हा चेहऱ्यावर हसू घेऊन जातो.ताण तणावातून मुक्त झालेला त्याचा चेहरा आम्हाला प्रेरणा व ऊर्जा देणारा असतो.यापुढेही कोणताही रुग्ण उपचाराविना राहणार नाही याची दक्षता घेण्याची शिकवण प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे संस्थापक निशिकांत भोसले-पाटील यांनी दिलेली आहे.भविष्यात आरोग्य क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा मानस असून भविष्यात एकही रुग्ण उपचाराविना राहणार नाही याची दक्षता आम्ही घेणार आहोततरी गरजू रुग्णांनी प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर मधील विविध सेवांचा लाभ घ्यावा.
स्वागत व प्रास्ताविक आधिष्ठता डॉ. रोहिणी करंबेळकर यांनी केले,आभार डॉ. अभिमन्यू पाटील यांनी मानले.यावेळी मेडिकल डायरेक्टर डॉ. विजय पाटील , पी. जी. डायरेक्टर डॉ. शिवानंद दौडामणी,प्रकाश शिक्षण मंडळाचे संचालक संदीप यादव,एल. आर . पी. आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वीरेंद्र मिनकीरे,चीफ अकाऊंटंट विवेक शेवाळे,रेडिओलॉजी विभाग प्रमुख डॉ. प्रदीप कुलकर्णी,डॉ. निखिल उरुणकर,डॉ. ऋषिकेश उखळे,डॉ. प्रसन्न गवळी,नर्सिंग सुप्रिटेंड मेघा चव्हाण,अभिजित पाटील,रणजित पाटील,रणधीर फार्णे,विश्वजित पाटील,रोहन जाधव,रोहन मोरे आदि मान्यवर उपस्थित होते.
निशिकांतदादांचे मोठेपण…
आरोग्य उपचार म्हटले की किती खर्च येईल,डाॅक्टर काय सांगतील,पुढे कोणत्या डाॅक्टरकडे पाठवतील असे अनेक प्रश्न रुग्ण व नातेवाईक यांच्या समोर उभा राहातात,उपचारासाठी पैसे नाहीत अथवा खर्च नको म्हणुन अनेक कुटुंब प्रमुख तर अंगावर आजार काढतात,सर्व सामान्यांना उपचारावरील खर्च न झेपणारा असतो.मात्र गेल्या अनेक वर्षापासुन भाजपाचे सांगली जिल्हाध्यक्ष व प्रकाश हाॅस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटरचे संस्थापक निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांनी हाजारो रुग्णवर मोफत उपचार केले आहेत,पैसे विना कोणीही उपचारापासुन वंचित राहाणार नाही याची त्यांनी नेहमी काळजी घेतली आहे.त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश हाॅस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर येथे वैद्यकीय क्षेत्रातील एमआरआय सारखे मिशन बसविण्यात आले आहे,एमआरआय ची सुविधा सर्व रुग्णांसाठी मोफत ठेवुन त्यांनी रुग्ण व नातेवाईक यांना मोठा दिलासा दिला आहे.त्यांच्या या मोठेपणाबद्दल सर्वस्तरातुन समाधान व्यक्त केले जात आहे,त्यांच्या या निर्णयाचे कौतुक ही होताना दिसते.









































































