Last Updated on 02 Nov 2023 9:23 PM by Sanjay Patil/Adhorekhit
वानखेडेवर भारताने केले श्रीलंकेचे लंकादहन
मोहम्मद शमी,मोहम्मद सिराज या दोघांनी बजावली निर्णायक भूमिका
मुंबई । भारताने श्रीलंकावर 302 धावांनी विजय मिळवला आहे. भारताचा विश्वचषकामधील हा सलग सातवा विजय ठरला.भारताने श्रीलंकेला विजयासाठी 358 धावांचे आव्हान दिले होते.मात्र श्रीलंकाने भारताच्या गोलंदाजांसमोर 55 धावांवरच गुडघे टेकले.भारताने या विजयासह उपांत्य फेरीमध्ये धडक मारली आहे.आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमधील हा सर्वात मोठा विजय ठरला.
रोहित शर्माच्या भारतीय संघानं श्रीलंकेचा 302 धावांनी धुव्वा उडवून,विश्वचषकाच्या साखळीत सलग सातवा विजय साजरा केला.मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरच्या सामन्यात भारताने श्रीलंकेला विजयासाठी 358 धावांचे मोठे आव्हान दिले होते.पण त्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची अवघ्या 55 धावांत दाणादाण उडाली.भारताच्या जसप्रीत बुमरा,मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी या वेगवान त्रिकूटाने श्रीलंकेचा डाव धावांत गुंडाळण्यात मोलाची भूमिका बजावली.
भारताकडून मोहम्मद शामीने दमदार गोलंदाजी करत 18 धावात 5 विकेट्स घेतल्या.त्याला मोहम्मद सिराजने 3 तर जसप्रीत बुमराहने 1 विकेट्स घेतल्या. श्रीलंकेकडून कुसल रजिताने सर्वाधिक 14 धावा केल्या. महीष तिक्षाणा आणि अँजेलो मॅथ्यूजने प्रत्येकी 12 धावांचे योगदान दिले.
तत्पूर्वी,प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने श्रीलंकेविरूद्ध 50 षटकात बाद 357 धावा केल्या. भारताकडून सलामीवीर शुभमन गिलने 92 विराट कोहलीने 88 तर श्रेयस अय्यरने 82 धावांची खेळी केली. दुर्दैवाने भारताच्या एकाही फलंदाजाचे आज शतक पूर्ण झाले नाही. रविंद्र जडेजाने 24 चेंडूत 35 धावांचे योगदान दिले.
मोहम्मद शमी बनला भारताचा बेस्ट बॉलर
मोहम्मद शमी याने भारतासाठी वनडे विश्वचषकात सर्वाधिक गडी करण्याचा विक्रम नावावर केला.शमीने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात आपल्या कोट्याताली पहिल्या पाच षटकांमध्ये 18 धावा खर्च करून 5 गडी बॅड केले.सोबतच विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक 45 गडी बाद करणारा गोलंदाज ठरला. भारताचा माजी दिग्गज झहीर खान आणि जवागल श्रीनात यांना त्याने मागे टाकले.
एकदिवसीय विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
मोहम्मद शमी- 45* (14 डाव)
झहीर खान – 44 (23 डाव)
जवागल श्रीनाथ – 44 (33 डाव)












































































