सांगली । राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याने 2014-15 मध्ये साखराळे युनिटची विस्तार वाढ व सहवीज प्रकल्प उभारणी करण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्याकडून प्रति टन रुपये 147 ची परतीची ठेव घेतली होती.यातील रुपये 75 प्रमाणे एकूण रक्कम रुपये 12 कोटी 35 लाख शुक्रवार दि.3 नोव्हेंबर 2023 रोजी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली जात आहे.उर्वरित रुपये 72 मार्च 2023 पूर्वी दिले जाणार असल्याची माहिती राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांनी दिली.
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याने 2014-15 मध्ये माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साखराळे युनिटची प्रति दिन 4 हजार मेट्रीक टन ऊस गाळप क्षमता प्रति दिन 7 हजार मेट्रीक टन केली आहे. तसेच याच युनिटमध्ये 28 मेगावॅट क्षमतेच्या सहवीज प्रकल्पाची उभारणीही केली आहे. यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्याकडून प्रति टन रुपये 147 ची परतीची ठेव घेतली होती. नुकत्याच दि.26 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही ठेव परत करण्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पॅट यांनी केली होती. त्याप्रमाणे ही ठेव परत केली जात आहे.
हेही वाचा – राजारामबापू कारखान्याने नेहमीच राज्यात अग्रेसर ऊस दर दिला : प्रतिक पाटील
सध्या साखराळे,वाटेगाव-सुरुल,कारंदवाडी,व तिप्पेहळळी-जत युनिटमधील सर्व ऑफ सिझनची कामे पूर्ण केली असून आज (बुधवारी) सर्व चारही युनिटमध्ये ऊसाची मोळी गव्हाणीत टाकून सर्व युनिट सुरू केली आहेत. सध्याच्या कमी पाऊसमानाने हा गळीत हंगाम आव्हानात्मक बनला आहे. आपणास जास्तीत-जास्त ऊस गाळपाचे उद्दिष्ट गाठायचे आहे. त्यामुळे कारखान्याच्या सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपण पिकविलेला सर्व ऊस आपल्या कारखान्यास घालून सहकार्य करावे,असे आवाहनही प्रतिकदादा पाटील यांनी केले आहे.(‘अधोरेखित’ च्या Facebook ला लाईक किंवा फॉलो करा)
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील,संचालक देवराज पाटील,प्रदीपकुमार पाटील,कार्तिक पाटील,विठ्ठल पाटील, कार्यकारी संचालक आर.डी.माहुली,चिफ अकौंटंट संतोष खटावकर,जयकर फसाले प्रामुख्याने उपस्थित होते.